Best News Portal Development Company In India

वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन !

🎂वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन🎂
————————————————
सिंदगाव ता.तुळजापूर येथील बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकर,चळवळीतील एक अभ्यासू आणि निष्ठावंत कार्यकर्ते,आपल्या मधुर वाणीतून बुद्ध फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करणारे भिमशाहीर हार्मोनियम वादक तथा गायक मा.चंद्रकांत शिंदे साहेब (प्रमाणित लेखापरीक्षक जिल्हा धाराशिव) यांचा दि.१० जून रोजी वाढदिवस आहे.
. मा.चंद्रकांत शिंदे हे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बी. कॉम. एम.कॉम ,जी.डी.सी अँड ए.पदवी संपादन करून दुय्यम निबंधक धाराशिव जिल्हा अंतर्गत सहकार संस्थेच्या ऑडिट पॅनलवर राहुन संस्थांच्या हिशोब तपासणीचे काम काटेकोरपणे व प्रामाणिकपणे करतात.आपलं काम घर संसार सांभाळत ते भीमगीत गायनाच्या माध्यमातून समाज समाज प्रबोधनाचे सामाजिक कार्य शालेय जीवनापासून ते आज तागायत करित आहेत. त्याच बरोबर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणाविषयी असलेल्या अडीअडचणी बाबत मार्गदर्शन करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रवर्त करण्यात त्यांचा मोठा हातखंड आहे.आपल्या सर्व नातेवाईकांमध्ये ते चंद्रकांत अण्णा म्हणून परिचित आहेत. त्यांचा सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा स्वभाव मानवतेची शिकवण देणार आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. आपल्या सर्व मित्रमंडळीत व आप्तेष्ट नातेवाईकात एक आदरानेचे स्थान त्यांनी निर्माण केला आहे.
दिनांक १० जून हा त्यांचा ६१ वा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा…

एस. के. गायकवाड
(रिपाइं (आठवले) जिल्हा जिल्हा सचिव तथा पत्रकार मु.पो. वागदरी ता.तुळजापूर

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india