Best News Portal Development Company In India

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई!

श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या १० जणांवर दंडात्मक कारवाई!
तुळजापूर प्रतिनिधी :- श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत आज मंदिर परिसरात थुंकताना आढळलेल्या १० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकांनी मंदिर परिसरात गस्त घालत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली. संबंधित १० जणांकडून प्रत्येकी ५०० रुपये याप्रमाणे एकूण ५,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मंदिर परिसर स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राखण्याच्या उद्देशाने मंदिर प्रशासनाने थुंकणे, घाण करणे तसेच कचरा टाकणे याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. या अनुषंगाने मंदिर संस्थानच्या सहायक स्वच्छता निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके कार्यरत असून ती दररोज मंदिर परिसरात पाहणी करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत.
श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखावी, कचरा कचरापेटीतच टाकावा तसेच परिसरात कोठेही थुंकू नये, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी सर्व नागरिकांनी आणि भावीक भक्तांनी मंदिर परिसरात स्वच्छता राखणेबंधनकारक आहे याची नोंद घ्यावी.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india