Best News Portal Development Company In India

उमरगा येथे धाडसी चोरी! भरदिवसा घराचे कुलूप तोडून पावणेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!

उमरगा येथे धाडसी चोरी! भरदिवसा घराचे कुलूप तोडून पावणेतीन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास!
​तुळजापूर प्रतिनिधी:- उमरगा येथे घरपोडीचे प्रमाण वाढले. लाखोंच्या चोऱ्या शहरातील डिग्गी रोड परिसरात एक धक्कादायक चोरीची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील तब्बल २ लाख ७५ हजार २५० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल वाहब शमशोद्दीन शेख (लदाफ) (वय ३८ वर्षे, रा. डिग्गी रोड, उमरगा) यांचे घर दि. ०८ जून २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजण्याच्या सुमारास बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेले २४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि १२ तोळे चांदीचे दागिने असा एकूण २,७५,२५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
​घरफोडी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी अब्दुल वाहब शेख यांनी तात्काळ उमरगा पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) उमरगा पोलिसांनी दि. ०८.०६.२०२६ रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५(अ) आणि ३३१(४) अन्वये मालमत्तेविरुद्धचा गुन्हा नोंदवला आहे.
​भरदिवसा झालेल्या या चोरीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, उमरगा पोलीस अज्ञात चोरट्याचा शोध घेत असून पुढील तपास करत आहेत.
काही अनुचित प्रकार दिसतात नागरिकांनी सतर्क राहून पोलिसांची संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india