Best News Portal Development Company In India

विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्रीबसवराज पाटील यांचा मतदारसंघात प्रचार फेरी व बैठक जोमात . उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव!

विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार माजी मंत्रीबसवराज पाटील यांचा मतदारसंघात प्रचार फेरी व बैठक जोमात .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

(दि. ११) रोजी आष्टी विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. सुरेशजी धस यांच्या जनसंपर्क कार्यालयात विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीस विधानसभा मतदारसंघातील तीनही तालुक्यांतील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी आमदार श्री. सुरेशजी धस यांनी उपस्थितांना संबोधित करत विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले. तसेच मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने कार्य करून बसवराज पाटील यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी आमदार अभिमन्यूजी पवार, रामराव गित्ते, जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, वाल्मिक निकाळजे, गणेश शिंदे, सौ. प्रतिभाताई गाडेकर, सौ. दीपालीताई जाधव, रोहिदास गित्ते, सौ. झिया बेग, रंगनाथ धोंडे, रोहिदास गाडेकर, गणेश नारायणकर, रमेश गावडे, अनिल ढोवळे, सुरेश उगलमूगले, भागवत येवले, अरुण निकाळजे, अरुण भालेराव, यशवंत खंडागळे, रामेश्वर बद्दर, अविशांत कुमकर तसेच प्रवीण पोकळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india