Best News Portal Development Company In India

धाराशिव/ उमरगा येथे माजी मंत्री बसवराज पाटिल यांच्या विधानपरिषद निवडणूक प्रचारार्थ महायुतीतीची बैठक संपन्न.

धाराशिव/ उमरगा येथे माजी मंत्री बसवराज पाटिल यांच्या विधानपरिषद निवडणूक प्रचारार्थ महायुतीतीची बैठक संपन्न.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने धाराशिव येथे माजी मंत्री तथा आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली महायुतीच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय व संघटनात्मक तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच प्रचाराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचारविनिमय करत निवडणुकीत एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी आमदार अभिमन्यूजी पवार, भाजप जिल्हाध्यक्ष श्दत्ताभाऊ कुलकर्णी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रजी धुरगुडे, मराठवाडा संयोजक नितीनजी काळे, शहराध्यक्ष अमितजी शिंदे, नगराध्यक्षा सौ. नेहाताई काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, भाजप सरचिटणीस श्नितीनजी भोसले, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, राहुल काकडे, पप्पू शिंदे, सौ. शीतल खांडेकर, संजय लोखंडे, प्रदीप शिंदे, दयानंद शिंदे, सौ. सुमन भद्रे, सौ. पूजा सरवदे, सौ. गोकर्णा कदम यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती , महायुतीचे अनेक पदाधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी आज

विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने उमरगा येथील भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेच्या मुख्यालयास भेट दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला व चर्चा केली.

या प्रसंगी भाऊसाहेब बिराजदार सहकारी बँकेचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार, सुशील दळगडे (नगरसेवक), विक्रम बापू बिराजदार (नगरसेवक), रामकृष्णपंत खरोसेकर, दिलीप भालेराव, प्रकाश आष्टे, अमोल पाटील, धनराज टिकंबरे, तानाजी दंडगुले, विठ्ठलराव बदोले, मदन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india