Best News Portal Development Company In India

स्थानिक गुन्हे शाखेची अग्नीशस्त्रा बाबत आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसासह 2 आरोपीस केले जेरबंद !

स्थानिक गुन्हे शाखेची अग्नीशस्त्रा बाबत आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी चार गावठी पिस्टल व तीन जिवंत काडतुसासह 2 आरोपीस केले जेरबंद !
तुळजापूर प्रतिनिधी:- स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव पोलिसांची आणखी एक मोठी कामगिरी अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना बेड्या ठोकण्यात पोलीस यशस्वी. दि.१3/०६/२०२६ रोजी मा. पोलीस अधिक्षक श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर, यांचे मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार सो यांचे आदेशाने मालाविषयी गुन्हे उघडकीस आणणे, तसेच अवैध शस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करिता स्थागुशाचे पथक रवाना होवुन पेट्रोलिंग करीत असतांना बेंबळी ते धाराशिव जाणारे रोडवर साळुंखे नगर कमानीजवळ चौकात आले असता पथकास गोपनिय बातमी मिळाली की इसम नामे- बालाजी बबन काळे, आश्रु उर्फ भुऱ्या भिमा काळे हे मोटरसायकल क्र एमएच 25 एयु 9433 वरुन धाराशिव ते बेंबळीकडे जाणारे रोडने बेंबळी कडे जाणार आहेत. त्यांचेजवळ 4 गावठी पिस्टल आहे अशी माहिती मिळाल्याने पथकाने सदरची माहिती वरीष्ठांना कळवुन लागलीच माहिती मिळालेल्या ठिकाणी दोन पंचाना बोलावुन साळुंखे नगर कमानीजवळ जावून थांबले असता माहिती मधील दोन इसम अंदाजे 23.00 वा.सु.मोटरसायकलवरुन जात असताना पथकास दिसले. पथकाने त्यास थांबवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- 1) बालाजी बबन काळे रा. कल्याणनगर भुम ता. भुमजि. धाराशिव,ह.मु. गोलेगाव पारधी पिडी ता. भुम जि. धाराशिव, 2)आश्रु उर्फ भुऱ्या भिमा काळे, वय 30 वर्षे, रा.जांब ता. भुम जि. धाराशिव असे सांगीतले पथकाने त्यांची पंचासमक्ष्‍ अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यात 4 लोखंडी धातुचा त्यास काळ्या रंगाचे पिस्टल ग्रीप असलेला गावठी पिस्टल  व तीन जिवंत काडतुसे मोटरसायकल सह असे 2,94,500/- रू. किंमतीचे मिळुन आल्याने ते जप्त केले. नमुद आरोपींची वैदयकीय तपासणी करून त्यांचेविरूध्द पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे अवैधरित्या शस्त्र बाळगलेप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना पुढील कारवाई करिता पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे हजर केले आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्रीमती. रितु खोखर, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. सचिन पांडकर,यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. अमोल मोरे, पोह -समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी,बळीराम शिंदे, मपोह- शोभा बांगर, पोलीस नाईक- अशोक ढगारे, चापोअं-दहीहांडे, शेरखाने, पोअ-मुंगळे यांचे पथकाने केली आहे.
सदर कारवाईमुळे सामान्य नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कारण एवढी अवैद्य
शस्त्रास्त्र येतात कुठून?  कशासाठी? या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरीत आहे. तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क आणि सजग राहून संशयित हालचाली दिसताच पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india