Best News Portal Development Company In India

भक्तीचा अर्थपूर्ण नजराणा ! छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला १ लाखांची देणगी; मंदिर संस्थानतर्फे सन्मान!

भक्तीचा अर्थपूर्ण नजराणा ! छत्रपती संभाजीनगरच्या भाविकाकडून श्री तुळजाभवानी देवीला १ लाखांची देणगी; मंदिर संस्थानतर्फे सन्मान!
​तुळजापूर प्रतिनिधी :- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी देशभरातून कोट्यवधी भक्त नतमस्तक होत असतात. अशाच एका निस्सीम भक्ताने देवीप्रती असलेली आपली श्रद्धा कृतीतून व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी आणि देवीच्या परम भक्त मालती खानापूरकर यांनी आज श्री आई तुळजाभवानी देवीच्या चरणी १ लाख रुपयांची रोकड देणगी म्हणून अर्पण केली.
​कुटुंबीयांसह घेतले कुलस्वामिनीचे दर्शन
​मालती खानापूरकर या आज सकाळी आपल्या मुलगा आणि मुलीसह तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. मुख्य मंदिरात देवीचे भावपूर्ण दर्शन घेतल्यानंतर, त्यांनी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या कार्यालयात जाऊन १ लाख रुपयांचा मदतनिधी अधिकृतपणे सुपूर्द केला.
​या दातृत्वाची दखल घेत मंदिर संस्थानच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उपेंद्र तामोरे यांच्या हस्ते मालती खानापूरकर व त्यांच्या कुटुंबीयांना श्री तुळजाभवानी देवीची पवित्र प्रतिमा आणि महावस्त्र भेट देण्यात आले.
​”देवीच्या चरणी अर्पण होणारी ही देणगी मंदिराच्या विविध धार्मिक व सामाजिक कार्यांसाठी अत्यंत मोलाची ठरते,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
​या छोटेखानी सन्मान सोहळ्याप्रसंगी मंदिर संस्थानचे इतर अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानापूरकर यांच्या या दातृत्वाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे. भक्तांनाही विश्वास आहे देवीच्या चरणी दिलेले दान हे सतमार्गी लागेल.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india