Best News Portal Development Company In India

तुळजापुरात खळबळ भावाला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, डोंगरात आणि लॉजवर नेऊन नराधमाचे कृत्य, गुन्हा दाखल!

तुळजापुरात खळबळ भावाला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, डोंगरात आणि लॉजवर नेऊन नराधमाचे कृत्य, गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर तालुक्यामध्ये खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे.
भावाला टिप्पर अंगावर घालून ठार मारण्याची वारंवार धमकी देत एका १७ वर्षीय ५ महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात एका तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार १९ जून २०२५ ते १५ मे २०२६ या दरम्यान घडला. आरोपी तरुणाने पीडित मुलीला गाठून “तुझ्या भावाच्या अंगावर टिप्पर घालून त्याला जीवे मारीन,” अशी वारंवार धमकी दिली. या भीतीपोटी पीडितेने कोणाला काही सांगितले नाही. याच धमक्यांचा गैरफायदा घेत आरोपीने तिला ईर्टिका कार आणि मोटरसायकलवरून वेगवेगळ्या लॉजवर तसेच डोंगराळ भागात नेले. तिथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.
​तुळजापूर पोलिसांकडुन गंभीर गुन्हा दाखल.
या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित मुलीने धाडस करत आपल्यासोबत घडलेला प्रकार समोर आणला. पीडितेने १८ जून २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर प्रथम खबरी अहवाल (FIR) दिला.
​पीडितेच्या खबरीवरून तुळजापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खालील कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. ​भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ६४(१) (बलात्कार), ७८ (महिलेचा विनयभंग/पाठलाग करणे), आणि ३५१(३) (गुन्हेगारी धमकी देणे).
​पोक्सो कायदा (POCSO Act): लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ८, आणि १२.
​या घटनेमुळे तुळजापूर आणि परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. (पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.) या संताप जनक कृत्याचा तुळजापूर नागरिकांतून निषेध व्यक्त होत आहे . यातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकडून या प्रकरणाची गंभीर गंभीर दखल घेऊन पीडीतेला न्याय देण्याची मागणी होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india