समता सैनिक दलाच्या सैनिक ईंदुताई भालेराव यांचा सेवानिवृत्ती झाल्यानंतर महामाता रमाई आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने सत्कार करून गौरविण्यात आले.
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
भारतीय बौद्ध सभेच्या कार्यकर्त्या व समता सैनिक दलाच्या सैनिक इंदुताई भालेराव या अंगणवाडी सेविका पदावरून सेवानिवृत्ती झाल्या असुन त्यांच्या शासकीय सेवेतील, सामाजिक, धार्मिक, कार्यात योगदान दिल्याबद्दल त्यागमुर्ति माता रमाई आंबेडकर जयंती महोत्सव समिती उमरगा यांच्या वतीने गुंजोटी रोड लगत असलेल बहुजन हीताय वस्तीग्रहात
त्यांना सन्मान चिन्ह देऊन यथोचित सत्कार करून गौरविण्यात आले .
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक गौतम सुरवसे तर प्रमुख पाहुणे म्हणून धम्मचारी प्रज्ञाजीत होते व तसेच रमाई जयंती महोत्सव समितीचे पदाधिकारी अनंत कुमार कांबळे किरण कांबळे ,सतीश ढोणे अविनाश भालेराव, संदीप कांबळे, बाळासाहेब भोसले,बलभिम गायकवाड, जीवन सूर्यवंशी, यांच्या सह औराद कुन्हाळी,तुगाव,बलसुर येळी, कोरेगाव,वागदरी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र सूर्यवंशी यांनी केले तर प्रास्ताविक संतोष सुरवसे, सन्मानचिन्ह वाचन सतीश ढोणे यांनी केले, आभार प्रदर्शन बाळासाहेब भोसले यांनी मानले.
ईंदुताई भालेराव यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.









