खासदार ओम राजे निंबाळकर यांच्या पक्ष प्रवेशाने उबाठा शिवसैनिक आक्रमक : नळदुर्ग येथे जोडे मारो आंदोलनाने केला ओम राजे यांचा तिव्र शब्दात निषेध
—————————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
होय नाही करत, विचार करून सांगतो म्हणत अखेर शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे धाराशिव लोकसभा मतदार संघांचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ज्या मतदारांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिले त्या मतदारांच्या भावनेचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थापोटी प्रामाणिक शिवसैनिकाशी गद्दारी करत नुकतच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.त्या पक्ष प्रवेशाचा नळदुर्ग ता. तुळजापूर येथील उबाठा शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेधकरून येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) शहर शाखेच्यावतीने उबाठा शिव सेने चे एकनिष्ठ नेतृत्व कमलाकर काका चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तर शिवसेना (उबाठा)सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजय दासरी यांच्या प्रमुख उपस्थितीत जोडे मारो आंदोलन करून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाचा तिव्र शब्दात जाहीर निषेध करत खासदारकीच्या राजीनाम्याची मागणी केली.
महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अत्यंत नाटयमयरित्या फोडा फोडीचे राजकारण होत आहे. आता पर्यंत शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकनिष्ठ असलेले महाराष्ट्रातील सहा खासदार अचानकपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.त्यात धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश आहे. इकडची दुनिया तिकडे होईल पण खासदार ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरेसी गद्दारी करणार नाहीत असा ठाम आत्मविश्वास असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांचा विश्वासघात करत लाखो मतांनी विजयी करणाऱ्या मतदाराच्या भावनेचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थक पोटी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे पाठ फिरवून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणारे ओमराजे निंबाळकर यांचा नळदुर्ग शहर शिव सेने च्या वतीने त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची शहरातील मुख्य रस्त्याने दिंड काढून नळदुर्ग अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गावर बसस्थानकाजवळ जाहीर निषेध सभा घेऊन जोडे मारो आंदोलन करून या “गद्दार ओम्याचे करायचं काय खाली मुंडक वरती पाय” अशा निषेधार्थ घोषणा देत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून जाहीर निषेध करून उपस्थित शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या खासदारकीचा राजीनामा मागितला.या आंदोलनाचे सूत्रसंचालन शिवसेना नळदुर्ग शहर शाखा प्रमुख शाखाप्रमुख संतोष पुदाले यांनी केले याप्रसंगी शिवसेनेचे जेष्ठ नेते कमलाकर काका चव्हाण, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजय दासरी,तुळजापूर तालुका उपप्रमुख सरदार सिंग ठाकूर, शिवसेनेचे नेते प्रदीप जोशी,
जि.प.सदस्य. डॉ.जितेंद कानडे, बाळकृष्ण पाटील आदीची ओमराजे निबांळकर यांच्या निषेधार्थ कडवट शब्दात भाषणे झाली. यावेळी शिवसैनिक मेजर राजेंद्र जाधव सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








