धक्कादायक! महामार्गावर धावत्या टेम्पोची ताडपत्री फाडून ‘व्हिस्की’ची चोरी; स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीला ठोकल्या बेड्या!
तुळजापूर प्रतिनिधी:- धाराशिव जिल्ह्यात मद्याच्या बाटल्यांची धूम फिल्मी स्टाईलने चोरी.१ लाख २३ हजारांचा मुद्देमाल जप्त.धाराशिव एलसीबीची आरोपीस बेड्या ठोकत धडक कारवाई.
सोलापूर-धुळे महामार्गावर धावत्या आयशर टेम्पोवर चढून, ताडपत्री फाडून आतून लाखो रुपयांची दारू चोरणाऱ्या टोळीचा धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) छडा लावला आहे. या प्रकरणी एका सराईत आरोपीला शिताफीने ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून १,२३,३९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दिनांक २१ जून २०२६ रोजी सोलापूर-धुळे महामार्गावरून जाणाऱ्या एका आयशर टेम्पोवर अज्ञात चोरांनी फिल्मी स्टाईलने चढून, टेम्पोची ताडपत्री फाडली होती. टेम्पोच्या आतील मौल्यवान साहित्य चोरून अज्ञात आरोपी पसार झाले होते. या घटनेबाबत येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २४७/२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महामार्गावरील ही चोरी अत्यंत संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाची असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. या फिल्मी स्टाईलच्या चोरीचा तपास व
पोलीस अधीक्षकांचे आदेश अन एलसीबीची अॅक्शन मोड!
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून धाराशिवच्या पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना हा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
दिनांक २२ जून २०२६ रोजी एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार व त्यांच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून ठोस माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पेढी भागात सापळा रचून संतोष राजेंद्र शिंदे (वय २२ वर्षे) याला शिताफीने ताब्यात घेतले.
९ बॉक्स व्हिस्की जप्त, साथीदारांचा शोध सुरू
ताब्यात घेतलेल्या आरोपी संतोष शिंदे याच्याकडे कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरीला गेलेले ‘ओकस्मिथ व्हिस्की’चे ९ बॉक्स (एकूण किंमत १,२३,३९२ रुपये) पंचनामा करून जप्त केले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी येरमाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्या इतर साथीदारांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
सदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. या पथकात खालील अधिकाऱ्यांचा व अंमलदारांचा समावेश होता:
पोनि: श्री. विनोद इज्जपवार (प्रभारी अधिकारी, एलसीबी) सपोनि- सुदर्शन कासार, अमोल मोरे
पोलीस अंमलदार: शौकत पठाण, प्रकाश औताडे, जावेद काझी, प्रदीप वाघमारे, फरहान पठाण, शोभा बांगर (महिला पोलीस), रत्नदिप डोंगरे (चालक), नागनाथ गुरव, आणि रोहीत दंडनाईक.
ह्या कारवाईने चोरांचे धाबे दणाणले असून”कानून के हात लंबे होते है” हे आणखी एकदा सिद्ध झाले.






