Best News Portal Development Company In India

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे प्राण गमावलेल्या पोलीस पाटील जयसिंग सरवदे यांच्या पत्नीस ५० लाखांचे सानुग्रह अनुदान सुपूर्त!

कर्तव्य बजावताना कोरोनामुळे प्राण गमावलेल्या पोलीस पाटील जयसिंग सरवदे यांच्या पत्नीस ५० लाखांचे सानुग्रह अनुदान सुपूर्त!
तुळजापूर प्रतिनिधी;-” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणी प्रमाणे पोलीस पाटील जयसिंग सरवदे यांच्या कुटुंबीयांना कोरोना काळात झालेल्या दुर्घटनेबद्दल आर्थिक मोबदला मिळाला . अथक प्रयत्नानंतर पोलीस पाटील जयसिंग सरवदे यांच्या कुटुंबीयांना शासकीय आर्थिक मदत अखेर पोहोचली ​पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासनाचा संवेदनशील पुढाकार!
​धाराशिव, कोरोना महामारीच्या अत्यंत कठीण काळात, जिवाची परवा न करता गावाची सुरक्षा करणाऱ्या आणि कर्तव्य बजावताना वीरमरण आलेल्या कोविड योद्ध्यांच्या कुटुंबीयांना शासनाने दिलेला शब्द पाळला आहे. धाराशिव जिल्ह्यातील दिवंगत पोलीस पाटील श्री. जयसिंग सरवदे यांच्या वारसदार पत्नी सौ. सरवदे यांना शासनाच्या विमा कवच योजनेअंतर्गत ५० लक्ष रुपयांचे सानुग्रह अनुदान आज सुपूर्त करण्यात आले. धाराशिव जिल्ह्याच्या माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर मॅडम यांच्या हस्ते हा धनादेश अत्यंत आदराने सुपूर्त करण्यात आला.
​कर्तव्य निभावताना झाला होता मृत्यू ​दिवंगत पोलीस पाटील श्री. जयसिंग सरवदे (रा. जिल्हा धाराशिव) हे २०२१ मधील कोरोना महामारीच्या भीषण लाटेदरम्यान आपल्या गावातील ‘कोरोना निर्मूलन दक्षता समिती’मध्ये सक्रियपणे कार्यरत होते. गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत होते. मात्र, हेच राष्ट्रीय कर्तव्य बजावत असताना त्यांना स्वतःला कोरोनाची लागण झाली आणि दुर्दैवाने १० एप्रिल २०२१ रोजी त्यांचे उपचारादरम्यान निधन झाल.
​कोविड-१९ संबंधित कर्तव्य बजावत असताना मृत्यू पावणाऱ्या शासकीय कर्मचारी व मानधनी कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. या शासन निर्णयाची अंमलबजावणी करत, पोलीस प्रशासनाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज अखेर हा ५० लक्ष रुपयांचा धनादेश दिवंगत सरवदे यांच्या पत्नीच्या स्वाधीन करण्यात आला. या मदतीमुळे सरवदे यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.
​”आपल्या प्राणाची आहुती देऊन कर्तव्य बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांच्या पाठीशी पोलीस प्रशासन नेहमीच खंबीरपणे उभे राहील.” श्रीमती रितु खोखर (पोलीस अधीक्षक, धाराशिव)
​धनादेश सुपूर्त करण्याच्या या छोटेखानी व संवेदनशील प्रसंगी धाराशिव जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे कार्यालय अधीक्षक श्री. सुनील बाबर साहेब यांच्यासह पोलीस विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत जयसिंग सरवदे यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या.
या सरकारी मदतीने त्यांचे झालेले नुकसान तर भरून निघत नाही पण पोलीस पाटील जयसिंग सरवदे यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबासाच्या उदरनिर्वाहासाठी थोडं उशिरा का होईना पण आर्थिक सहाय्य लाभले. या कार्याचे सर्व नागरिकांत कौतुक होत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india