हॉटेलमध्ये पतीला चाकूचा धाक दाखवून १९ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, धाराशिवमधील धक्कादायक घटना, तिघांवर गुन्हा दाखल !
तुळजापूर प्रतिनिधी :- विकृत मानसिकतेचा कळस धाराशिव जिल्ह्यातील हॉटेलमध्ये संताप जनक घटना . पतीसोबत हॉटेलमध्ये आराम करण्यासाठी गेलेल्या एका १९ वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना धाराशिव शहरात समोर आली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तीन नराधमांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो (POCSO) आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Atrocity Act) गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १९ वर्षीय महिला आणि तिचे पती २२ जून २०२५ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमधील रूममध्ये आराम करण्यासाठी जात होते. याच दरम्यान हॉटेलमधील तीन तरुणांनी त्यांना गाठले. आरोपींनी पीडितेच्या पतीला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली आणि बाजूला पकडून ठेवले.
या भयानक परिस्थितीत, तिघांपैकी एका नराधमाने पीडित महिलेवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. तर उर्वरित दोन साथीदारांनी पीडितेच्या पतीला बेदम मारहाण केली. “हा प्रकार जर कोणाला सांगितला, तर जीवे ठार मारू,” अशी धमकीही आरोपींनी दिली.
या धक्कादायक प्रसंगानंतर पीडित महिलेने २३ जून २०२६ रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. पीडितेने दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) पोलिसांनी तत्परतेने पावले उचलत आरोपींवर खालील कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे- भारतीय न्याय संहिता (BNS) कलमे: ६४(१) (बलात्कार), १२६(२), १२७(२), ११८(१), ३२४(४), ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५). बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO): कलम ४, ८ आणि १२.
अॅट्रॉसिटी कायदा- अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम कलम ३(१)(आर)(एस), ३(१)(डब्ल्यु)(i)(ii) आणि ३(२)(व्हिए).
या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास अत्यंत गांभीर्याने करत आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांतून संताप जनक प्रतिक्रिया उमटत आहेत.






