आष्टा(जहागीर) येथे विजेच्या तारासह पोल कोलमडून पडल्याने शेतकऱ्यांना मशागतीची अडचण.
तुरोरी सबस्टेशन अंतर्गत विज वितरण अधिकारी ,कर्मचाऱ्यांसह दुर्लक्ष.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील आष्टा(जहागीर) येथील शेत जमीन सर्वे नंबर ६१मधिल शेतकरी बलभीम सटवाजी भालेराव, महादेव पांडुरंग सुर्यवंशी ,बापुराव तुळशीराम जाधव या तीघाच्या ही शेतजमीनीत गेल्या चार ते पाच दिवसाकाठी विजपुरठा खंडीत असलेले तारेसह पोल कोलमडून पडले असुन सदरचे पोल व तारामुळे शेतकर्यांना मशागतीसाठी फार मोठी अडचण होत असल्याने तुरोरी सबस्टेशन अंतर्गत विज वितरण अधिकारी ,कर्मचारी यांना शेतकर्यांनी वेळोवेळी सुचणा देवुन ही कोलमडून पडलेले पोल व विजेच्या तारा हटविण्यासाठी नाकर्तेपणा व जाणीवपूर्वक कसुर केले जात असल्यामुळे पेरणीसाठी पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाला पेरणीसाठी, मशागतीसाठी अडचण निर्माण होत असलेली कोलमडून पडलेल्या विजेच्या तारा सह पोल हटविण्यासाठी लोकप्रतिनिधी, व वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाने वेळीच लक्ष घालण्यासाठी त्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबियांची मागणी जोर धरत आहे.








