Best News Portal Development Company In India

धाराशिव/लातूर/बीड विधानपरीषदेचे नवनिर्वाचित आमदार माजी मंत्री बसवराज पाटिल यांचा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष सद्गुगुरू गहिनीनाथ महाराज यांच्या सह विविध मान्वराकडुन विविध ठिकाणी सत्कार सन्मान.

धाराशिव/लातूर/बीड विधानपरीषदेचे नवनिर्वाचित आमदार माजी मंत्री बसवराज पाटिल यांचा पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी देवस्थानचे सह अध्यक्ष सद्गुगुरू गहिनीनाथ महाराज यांच्या सह विविध मान्वराकडुन विविध ठिकाणी सत्कार सन्मान.

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

धाराशिव, लातूर, बीड,विधान परिषद निवडणुकीतील बसवराज पाटील याच्या विजयाबद्दल पंढरपूरच्या श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर देवस्थान समितीचे सह-अध्यक्ष ह.भ.प सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर व समस्त विश्वस्त मंडळ तसेच वारकरी संप्रदायाच्या शिष्टमंडळाकडून सत्कार करण्यात आला. या सन्मानाबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त आ. बसवराज पाटिल यांच्या वतिने अभार व्यक्त करण्यात आले.
तसेच वारकरी संप्रदायाच्या आशीर्वादाने जनतेची सेवा आणि विकासाची वाटचाल अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्पही नवनीर्वाचीत आमदार बसवराज पाटिल यांनी व्यक्त केले.
तसेच राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांचीस दिच्छा भेट घेऊन आभार व्यक्त केले. याप्रसंगी माननीय बावनकुळे साहेबांनी विधान परिषद विजयाबद्दल अभिनंदन करून, शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील, पाटील, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव, मदन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच मुंबई येथे लातूर जिल्ह्याचे माननीय पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले साहेबांची भेट झाली. विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी माननीय पालकमंत्री साहेबांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी मुरुम चे नगराध्यक्ष बापूराव पाटील, शिरीषप्पा उटगे, सचिन गुदगे, शरण पाटील, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे, प्रकाश आष्टे,
आमदार सुरेशजी धस, आमदार अभिमन्यूजी पवार तसेच नवनिर्वाचित आमदार राजेंद्रजी राऊत व तुळजा भवानी साखर कारखान्याचे चेअरमन सुनीलजी चव्हाण अदि उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india