Best News Portal Development Company In India

धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची जुगार खेळणाऱ्या वरती “करडी नजर ” जिल्हा भरात धरपकड:लाखोंचा मुद्देमाल जप्त!

धाराशिव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेची जुगार खेळणाऱ्या वरती “करडी नजर ” जिल्हा भरात धरपकड:लाखोंचा मुद्देमाल जप्त!
तुळजापूर प्रतिनिधी:- मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर  यांचे मार्गदर्शनखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कारवाई करण्यासाठी दि. 25.06.2026 रोजी गस्तीस होते. दरम्यान शिवाजी चौक धाराशिव येथे आले असता पथकास गोपनीय माहिती मिळाली की,  पाथ्रुड चौक, नाझ हॉटेलचे समोरील वडारवाडा कमानीचे आतमध्ये विजय मुद्दे यांचे घरासमोर काही इसम जुगार खेळत आहेत. यावर पथकाने नमूद ठिकाणी 01.30 वा. सु. छापा टाकला असता तेथे तालीम गल्ली धाराशिव येथील रहिवाशी – 1.अकलाक शेख, सारोळा ता. जि. धाराशिव येथील 2.प्रभाकर साळुंखे, उंबरे कोठा धाराशिव 3.बाबु ठाकर राठोड, भिमनगर धाराशिव 4.करण वाघमारे, सारोळा (बु) ता. जि. धाराशिव 5.प्रशांत स्वामी, तालीम चौक धाराशिव 6.शाहेद शेख, बार्शी नाका धाराशिव 7. शेखर शिंदे, खाजानगर धाराशिव 8.समद शेख, पाथ्रुड चौक धाराशिव 9. राजु मुद्दे, सारोळा ता. जि. धाराशिव 10. सागर बाकले, पाथ्रुड चौक धाराशिव 11. विजय मुद्दे, हे सर्व लोक तिरट मटका जुगार खेळत असताना जुगार साहित्यासह रोख रक्कम व 3 मोटरसायकल, मोबाईल 8 असा एकुण 3, 34, 020 ₹ चा माल बाळगलेले असताना पथकास आढळले. यावर पथकाने जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अंतर्गत धाराशिव शहर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्रीमती  रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार, सपोनि श्री. अमोल मोरे, पोह/ शौकत पठाण, धयानंद गादेकर, बहीराम शिंदे,  दत्तात्रय राठोड, जावेद काझी, प्रकाश औताडे, मपोहा/ शोभा बांगर, पोअं/ पुष्कर मुंगळे, चापोहा /सुभाष चौरे, चापोअं/शेरखाने यांचे पथकाने केली आहे.
सदरील धडक कारवाईने अवैध धंद्या करणाऱ्यांचे जिल्हा भरात धाबे दणाणले आहे. असे अवैध धंदे दिसताच पोलिसांची संपर्क करण्याची आवाहन करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india