शंभर टक्के सवलतीचे व पन्नास टक्के रोखीचे विद्यार्थी एसटी बस प्रवासी पास प्रत्यक्ष शाळेत जाऊन वाटप : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांचा अनोखा उपक्रम
—-—————————————————-
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर १००% सवलतीचे एसटी बस प्रवासी पास व विद्यार्थ्यांसाठी ५०% सवलतीचे एसटी बस रोखीचे प्रवासी पास नळदुर्ग तालुका तुळजापूर येथील बस स्थानक वाहतूक नियंत्रकानी,हुतात्मा बाबुराव बोरगावकर माध्यमिक शाळा साखर कारखाना नळदुर्ग ता.तुळजापूर येथील विद्यार्थी व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत जाऊन वाटप करून विद्यार्थाना दिलास दिला.
. महाराष्ट्र शासनाने शालेय विद्यार्थिनी मुलींना आपल्या गावातून बाहेरगावी शिक्षणांकरिता जाणे येण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शंभर टक्के ( १०० % ) मोफत एसटी बस प्रवासी पास योजना सुरू केली असून मुलांसाठी ५०% सवलतीचे प्रवास भाडे या तत्त्वावर एसटी पास दिला जातो या दोन्ही प्रकारच्य लाभ धारक विद्यार्थी व विद्यार्थीनीना नळदुर्ग, वसंत नगर,मानेवाडी,व जवळच्या गावातून हुतात्मा बोरगावकर माध्यमिक शाळा साखर कारखाना नळदुर्ग येथे शिक्षणासाठी येण्या जाण्या करिता नळदुर्ग स्थानकाचे वाहतूक नियंत्रण महेश डुकरे,अनिल हांडे, गुंडू डुकरे,मुकुंद वैद्य आदींनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे विभागीय नियंत्रक अजय पाटील, विभागीय वाहतूक अधिकारी मधुरा जाधवर,आगार प्रमुख तुळजापूर महेश रामपुरे, आदींच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष शाळेत जाऊन एसटी बस प्रवासी सवलत पासचे वाटप केले.या प्रसंगी शाळेचे संस्थापक संचालक मोहनजी भोसले प्रशालेचे मुख्याध्यापक नरवडे आर पी, विभाग प्रमुख मोरे सहशिक्षक सुभेदार एस. एस,नरे व्ही.सी.सहशिक्षिका कामशेटी सी.पी. निवृत्ती भोकरे, एस.पी.भोसले उपस्थित होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या अनोख्या उपक्रमाचे पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.






