*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूल येथे राजश्री शाहू महाराज जयंती साजरी*
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन बहुजन समाजाच्या उद्धारासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे,बहुजनांच्या झोपडी पर्यंत शिक्षणाचा प्रकाश पोहोचवणारे, महाराष्ट्रात वसतिगृहाची साखळी निर्माण करून दीनदुबळ्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे आणि बहुजनांना प्रशासनात हक्क देणारे ऐतिहासिक आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
(दि.२६) रोजी प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व धनराज तेलंग यांच्या हस्ते राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून प्रतिमापूजन करण्यात आले व अभिवादन करण्यात आले.
यावेळी नागेश स्वामी संजय रूपाजी सदानंद कुंभार प्रवीण शिंदे बालवाडी ताई मुळे मॅडम वनमाला वाले सविता राठोड उपस्थित होत्या.






