उमरगा काँग्रेस कार्यालयात छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
——–
उमरगा शहर प्रतिनिधी : सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा विचार समाजात रुजविणारे महान समाजसुधारक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उमरगा येथील काँग्रेस कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार यांनी शाहू महाराजांनी शिक्षण, आरक्षण, सामाजिक समता आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा आणि समाजहिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
शाहू महाराजांनी राबविलेल्या लोककल्याणकारी धोरणांमुळे वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळाला. समतेवर आधारित समाजरचनेचा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा, असे मत उपनगराध्यक्ष विजय वाघमारे यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक विजय दळगडे , बाबा मस्के , ख्वाजा मुजावर , युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदर्श कोथिबरे, अभिषेक औरादे , अमित रेड्डी , याकूब लदाफ , माजी पंचायत समिती सदस्य अभिमन्यू भोसले , दयानंद पाटील , जीवन सरपे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते. शेवटी उपस्थितांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्याचा निर्धार व्यक्त केला.






