Best News Portal Development Company In India

मोहरमनिमित्त राहत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रवाशांना थंडगार शरबत वाटप!

मोहरमनिमित्त राहत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे प्रवाशांना थंडगार शरबत वाटप
———-
उमरगा शहर प्रतिनिधी : पवित्र मोहरम महिन्याच्या निमित्ताने मानवता, सेवा आणि बंधुभावाचा संदेश देत उमरगा येथील राहत चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शहरातील बसस्थानक परिसरात प्रवासी व नागरिकांसाठी थंडगार शरबत वाटपाचा सेवाभावी उपक्रम उत्साहात पार पडला. मोहरम हा त्याग, संयम आणि मानवसेवेची प्रेरणा देणारा पवित्र महिना मानला जातो. याच भावनेतून ट्रस्टने बसस्थानकावर ये-जा करणारे शेकडो प्रवासी, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य नागरिकांना थंडगार शरबताचे वाटप करून उष्णतेत दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या उपक्रमामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त करत ट्रस्टच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.या उपक्रमाचे नियोजन व नेतृत्व राहत चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष जाहेद मुल्ला यांनी केले. यावेळी मुस्तफा कारभारी, खलील शेख, रियाज पंढरपुरे, चांद शेख, आफताब शेख, फैसल पटेल, सोहेल लदाफ, साद कारभारी यांच्यासह ट्रस्टचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला. राहत चॅरिटेबल ट्रस्टकडून शहरात वेळोवेळी सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे विविध उपक्रम राबविले जात असून, मोहरमच्या पावन पर्वानिमित्त बसस्थानकासारख्या गजबजलेल्या ठिकाणी राबविण्यात आलेल्या या शरबत वाटप उपक्रमाचे उमरगा शहरातील नागरिक, प्रवासी आणि सामाजिक क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात स्वागत व कौतुक करण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india