वागदरी येथे मोहरम निमित्त ताजिया मिरवणूक उत्साहात
——————————————————-
नळदुर्ग (एस.के.गायकवाड):
सत्य धैर्य आणि मानवतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जाणारा मुस्लिम धर्मियांच्या मोहरम या सणानिमित्ताने वागदरी तालुका तुळजापूर येथे ताजिया मिरवणूक मोठ्या उत्साहाने व आनंदाने आणि विविध कार्यक्रमाने काढण्यात आली.
मुस्लिम धर्मियांच्या सणापैकी मोहरम हा सन अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो.या सणापासून इस्लाम नववर्षाची सुरुवात होते.त्याचबरोबर हा सण शौर्य सत्य व मानवतेचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो या सणा निमित्ताने प्रषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू इमाम हुसेन यांच्या सत्यासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण म्हणून मुस्लिम बांधव त्यांना आदरांजली वाहतात. दरवर्षी हा सण वागदरी येथे गावातील सर्व धर्मीय लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने साजरा करतात.दहा दिवस गावात ठरलेल्या ठिकाणी प्रथेप्रमाणे तीन पंजे अर्थात ताजिया बसून रोज मुस्लिम बांधवांच्या वतीने धार्मिक कार्यक्रम केले जातात व दहाव्या दिवशी गावातून ताजिया मिरवणूक काढली जाते.
याही वर्षी येथे मोहरम सणा निमित्त मोठ्या उत्साहाने व आनंदाने आणि विविध उपक्रमाने ताजिया मिरवणूक काढण्यात आली.गावातील मुख्य रस्त्यावरून ही मिरवणूक अत्यंत शांततेत आणि उत्साही वातावरणामध्ये काढण्यात आली. या प्रसंगी जागोजागी मिरवणुक आढवून अनेक भाविक भक्तीने ताजियाचे पुजन करुन दर्शन घेतले.
. तर मिरवणुकीच्या रस्त्यावरील सर्व धर्मीय लोक आपल्या घरासमोर मिरवणूक आली असता मनोभावे पाण्याचा सडा टाकून मिरवणुकीचे स्वागत करून ताजियाचे पूजन करून दर्शन घेतले.मुस्लिम बांधवांच्या वतीने चौकात या सणानिमित्ताने मानवतेचे प्रतीक म्हणून शरबत वाटप करण्यात आले.यामुळे गावात गोडवा निर्माण होऊन आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते.
शेवटी श्री संत भवानी सिंग महाराज मंदिर परिसरात या मिरवणुकीची सांगता करण्यात आली.या प्रसंगी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.







