Best News Portal Development Company In India

आष्टा जहागीर येथे मोहरम सण मीरवणुकीने उत्साहात साजरा .

आष्टा जहागीर येथे मोहरम सण मीरवणुकीने उत्साहात साजरा .
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
तालुक्यातील आष्टा जहागीर येथे दहा दिवसापासून चालू असलेल्या मुस्लिम धर्मातील अतिशय महत्त्वाचा असुन परंपरेनुसार चालत आलेला सण माणला जातो .
मुस्लिम बांधवासाठी मोहरम हा ईस्लामी कँलेंडरचा पहिला महिना असुन तो अतिशय पवित्र माणला जातो मोहरमचा दहावा दिवस हा अतिशय महत्वाचा माणला जातो मोहरमच्या दहाव्या दिवसाला( योमे अशुरा)म्हणतात या दिवशी उपवास ,रोजा ठेवणे ,प्रार्थना करणे, गोरगरिबांना अन्नदान करणे खुप पुण्य माणले जाते .
त्याच अनुशंघाने आष्टा जहागीर येथे मोरम सण आगदी उत्साहात आनंदाने मीरवणुकीने साजरा करण्यात आला.
मोहरमच्या मिरवणुकीमध्ये केवळ मुस्लीमच नव्हे तर सर्व धर्मिय लोक मीरवणुकीदरम्यान सहभागी होवून हिंदू मुस्लिम सामाईक ऐक्याचे प्रतिक दिसुन आले .
यावेळी सरपंच सतिष जमादार,उपसरपंच बापुराव गायकवाड, पोलीस पाटिल महेश जाधव ,तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष जिवन जाधव, महादेव पाटिल, दादाराव गायकवाड, शिवाजी गायकवाड, प्रभाकर पाटील, पिंटु जाधव,अब्दुल शेख,चांद शेख,फतरु शेख, मन्सूर शेख,रूक्मोद्दिन शेख,अनवर शेख,अशिफ शेख,नबी शेख,दस्तगीर शेख, हसन शेख,गुलामोद्दीन शेख,मोहदिनशहा शेख,मेहराज शेख,आयाज शेख, मुनिर शेख,ईलाही शेख, नाशिर शेख, अदिसह हिंदू मुस्लिम महिला पुरुष समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मीरवणुकीदरम्यान सर्व जनतेस दुधाचे (सरबत) वाटप करण्यात आले तसेच रविवार दि २८ रोजी ग्रामस्थांना भोजनाचे वाटप करण्यात येणार आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india