. वीज वाहक मनोऱ्यामुळे बाधित शेतकऱ्यांना सरसकट मावेजा द्यावे या मागणीसाठी वीज वहाक मनोऱ्यावरच उपोषण करणार : रावसाहेब वाघमारे यांनी दिले जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन
——————————————————
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
तुळजापूर तालुक्यातील मौजे लोहगाव वागदरी अंणदुर शिवारामध्ये होत असलेल्या वीज वाहिनी मनोरार्यामुळे बाधित शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कंपनीस पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून बाधित सर्व शेतकऱ्यांना सरसकट मावेजा रक्कम देण्यात यावी या प्रमुख मागणी सह अन्य मागण्यासाठी दि.३o जून २o२६ रोजी वागदरी दहिटणा रोड लगतच्या वीज वाहक मनोऱ्यावर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार ) चे सामाजिक न्याय विभागाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्ष रावसाहेब वाघमारे यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
. जिल्हाधिकारी धाराशिव यांना रावसाहेब वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तुळजापूर तालुक्यातील वागदरी अणदूर लोहगाव येथील शिवारामध्ये सोलार क्राफ्ट पावर इंडिया – ७ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी यांच्याकडून होत असलेल्या वीज वाहिनी मनोरा उभारणीच्या संदर्भात शेतकऱ्याची जमीन संपादित केलेल्या संचिका जमीन, संपादित शेतकऱ्यांची यादी जमीन संपादित केलेला अहवाल,शेतकऱ्यांना पाठवण्यात आलेल्या नोटीस पत्र, शेतकऱ्याचे सहमती पत्र व प्रकल्प उभारण्याचा संदर्भातील शासन निर्णयाच्या प्रती मिळण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी महसूल यांच्याकडे मागणी केली होती परंतु संबंधित कार्यालयाकडून सदरील माहिती देण्यात आली नाही.म्हणून जिल्हाधिकारी धाराशिव यांना दि. २ मार्च २०२६ रोजी रितसर निवेदन दिले होते. तरी परंतु या निवेदनावर अद्याप कसली कारवाई न झाल्याने शेतकऱ्यांना सरसकट मावेजाची रक्कम द्यावी,शेतकऱ्यांच्या कागदपत्राची चौकशी करावी, सर्व शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या रकमांची चौकशी करावी,उभारण्यात आलेल्या मनोरा स्तराचा शेतकऱ्यासह जिओ टॅग फोटो तपासण्यात यावा, जमीन संपादित झाली किंवा नाही याची चौकशी करावी, काही शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला तर काही शेतकऱ्यांना
शेतकऱ्यांना अल्प रक्कम देऊन फसवणूक करणाऱ्या कंपनीवर व कंपनीच्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी आधी मागण्याचे निवेदन दिले होते.परंतू या निवेदनावर अध्याप कारवाई झाली नाही म्हणून दिनांक ३० जून २o२६ रोजी वागदरी दहिटणा रोडलगतच्या वीज वाहिनी मनोऱ्यावर आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.






