Best News Portal Development Company In India

प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम शैक्षणिक साहित्य वाटप. उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव!

प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम शैक्षणिक साहित्य वाटप.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे श्री बसवेश्वर हायस्कूल जेवळी वर्गमित्र 1985 ट्रस्ट जेवळी ता. लोहारा यांच्यातर्फे इयत्ता पाचवीच्या 130 मुलांना शैक्षणिक साहित्य (वही) वाटप करण्यात आले वर्ग मित्र 1985 ट्रस्ट 2018 पासून श्री बसवेश्वर हायस्कूल जेवळी, जि.प.शाळा दक्षिण जेवळी, जि.प.शाळा रुद्रवाडी जि प शाळा फनेपूर जि. प. शाळा विलासपूर पांढरी जि. प. शाळा वडगाव,जि. प. शाळा वडगाव वाडी जि. प. शाळा सय्यद हिप्परगा,जि.प. शाळा सालेगाव आदी शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप केलेले आहेत प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद आणि संस्थेतल्या शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप करतात यावर्षी प्रतिभा निकेतन विद्यालय मुरूम येथे वर्ग मित्र 1985 तर्फे पाचवीच्या मुलांना वही वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य घुरघुरे सर,प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य कोंढारे सर, पर्यवेक्षक परसाळगे सर, एस बी एच एस वर्ग मित्र 1985 ट्रस्टचे अध्यक्ष शिवशरण तांबडेसर,उपाध्यक्ष वैजनाथ पाटील,संचालक संजय राजपूत, नूतन प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक राजशेखर कोरे,पंडित कारले पांडुरंग वाकडे लोहारा पंचायत समितीचे माजी उपसभापती व्यंकट कोरे,रवी स्वामी सर, कोराळेसर,संतोष बिंदगे सर,पाटील सर, चव्हाण सर,कंटेकुरे मॅडम, सपाटे मॅडम,स्वामी मॅडम, कोराळे मॅडम, कु.अनिशा फुगटे उपस्थितांचे आभार मानून वंदे मातरम गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india