*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलच्या वतीने पल्स पोलिओ मोहिम जनजागृतीसाठी रॅलीचे आयोजन*
तुरोरी प्रतिनिधी दमयंती भालेराव.
उमरगा येथील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये 28 जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या पल्स पोलिओ अभियानाचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी व पल्स पोलिओ मोहिमेची जनजागृती करण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा येथील विद्यार्थ्यांनी पल्स पोलिओ मोहिमेच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढून लोकांमध्ये जनजागृती केली ही प्रभात फेरी जिल्हा परिषद हायस्कूल, तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन,बाळासाहेब ठाकरे चौक, शिवाजी चौक,जुनी पेठ,हमिद नगर या भागातून काढण्यात आली विद्यार्थ्यांच्या हातात वेगवेगळे घोषणांचे फ्लेक्स दिसत होते.दोन थेंब पोलिओचे आयुष्य लाभेल मोलाचे, दोन थेंब बाळाला जीवन मिळेल सुरक्षित त्याला, पोलिओ पाजा देश वाचवा,लहान वयात पोलिओ डोस आयुष्यात टाळा अपंगत्वाचा दोष, अशा वेगवेगळ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. प्रभात फेरी मध्ये ग्रामीण रुग्णालय उमरगा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. उमाकांत बिराजदार प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे आरोग्य सहाय्यक अनंत कुलकर्णी आरोग्य कर्मचारी संदीप पाटील सहभागी झाले होते. या रॅलीसाठी बशीर शेख विद्यानंद सुत्रावे सोनाली मुसळे प्रवीण शिंदे नागेश स्वामी भाग्यश्री पंडित वर्षाराणी पाटील यांनी परिश्रम घेतले. पल्स पोलिओ अभियानांतर्गत काढण्यात आलेल्या रॅली मध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते








