Best News Portal Development Company In India

बालकांच्या आरोग्यासाठी रक्तगट तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद डोंबिवली, दि. 28 जून :

बालकांच्या आरोग्यासाठी रक्तगट तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
डोंबिवली, दि. 28 जून :
इनोव्हेट पॅथॉलॉजी लॅब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या लहान मुलांसाठी विशेष रक्तगट तपासणी शिबिराला आज नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने लहान मुलांच्या रक्तगटाची तपासणी करण्यात आली. तसेच नागरिकांसाठी मोफत मधुमेह (Sugar) व रक्तदाब (BP) तपासणी करून आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांचा रक्तगट जाणून घेतला आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्वही समजून घेतले.
या उपक्रमाचे आयोजन श्री अश्विन हेमंतकुमार केळकर, मुंबई विभाग अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी मुंबई विभाग उपाध्यक्ष श्री उदयराज सिताराम तळेकर, मुंबई विभाग सचिव प्रा. दीपक जाधव, कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष श्री व्यंकटेश नायडू, ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मराठे तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजाच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. भविष्यातही नागरिकांच्या हितासाठी अशा विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india