श्री तुळजाभवानी मंदिरातील सुरक्षा रक्षक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार देण्याची मागणी !
तुळजापूर प्रतिनिधी;-महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री तुळजाभवानी मंदिरातील कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी.
तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात काम करणाऱ्या सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने तुळजाभवानी मंदिर संस्थांचे अध्यक्ष कीर्ती कुमार पुजारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अप्पर जिल्हाधिकारी उपेंद्र तामोरे यांना दिलेल्या निवेदनातून राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी शासनाच्या किमान वेतन कायद्याप्रमाणे तुळजाभवानी मंदिरामध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षारक्षक आणि स्वच्छता कर्मचारी यांना वेतन देण्यात यावी अशी मागणी केली आहे. या निवेदनाच्या सोबत त्यांनी शासनाच्या वतीने निर्गमित झालेल्या किमान वेतन परिपत्रकाची प्रत जोडून निवेदन दिलेले आहे ज्यामध्ये सुरक्षारक्षक यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे २३२०६ व स्वच्छता कर्मचारी यांना या कायद्यानुसार १६६५८ असा पगार मिळावा अशी मागणी केली आहे. येथे सुरक्षा रक्षक कर्मचारी यांना १३ हजार रुपये व स्वच्छता कर्मचारी यांना १२ हजार रुपये वेतन दिले जाते हे अन्यायकारक आहे. संबंधित गुत्तेदाराला मंदिर संस्थांच्या वतीने सूचना करून किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन देण्यात यावे अशी मागणी या निवेदनाद्वारे राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने अध्यक्ष यशवंत भोसले यांनी केलेली आहे.
या संदर्भात आपण पंढरपूर देवस्थान मध्ये प्रयत्न केले आणि तेथील कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे पगार दिला जात आहे असा दुजोरा जोडून पंढरपूर प्रमाणे तुळजापूर देवस्थान समितीने कर्मचाऱ्यांच्या हितासाठी किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी शक्तीने करण्याची संबंधित कंत्राटदारांना सूचना करावी, या मागणीच्या अनुषंगाने लातूर कामगार न्यायालयामध्ये देखील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे अध्यक्ष यशवंत भोसले यांनी सांगितले आहे.







