उमरग्यात ३ जुलै रोजी ‘भव्य महामोर्चा’; अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात कृती समिती आक्रमक!
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे ‘अ, ब, क, ड’ असे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा हा निर्णय महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बांधलेली ५९ जातींची वज्रमुठ तोडण्याचे षडयंत्र आहे, असा आरोप करत या निर्णयाविरोधात उमरगा तालुक्यात ‘अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने शुक्रवार, दि.३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता उमरगा येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात कृती समितीने उमरगा तालुक्यातील सर्व आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी जनतेला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “एका जातीचा अपवाद वगळता कोणीही या उपवर्गीकरणाचे समर्थन करत नाही. मागासवर्गीय समूहात फूट पाडण्याचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सर्वांनी एकजूट होणे गरजेचे आहे,” असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.मोर्चाच्या माध्यमातून शासनाकडे
बदर समितीचा अहवाल सार्वजनिक करा, अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भातील बदर समितीचा संपूर्ण अहवाल तात्काळ जनतेसाठी खुला करावा, जेणेकरून नागरिकांना त्यावर आपल्या सुचना आणि आक्षेप नोंदवता येतील.उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवा,सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला उपवर्गीकरण करणे बंधनकारक केलेले नाही. त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘अ, ब, क, ड’ उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवावी.कंत्राटी नोकर भरती बंद करा,शासकीय सेवेतील कंत्राटी पद्धतीची नोकर भरती तात्काळ बंद करून अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील रिक्त पदांचा अनुशेष तात्काळ भरावा व पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी.
नो एंट्री’ प्रक्रिया रद्द करा, राखीव प्रवर्गातील सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’ देण्याची अन्यायकारक प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी.अत्याचार थांबवा,राज्यातील मागासवर्गीयांवर वाढत असलेले अन्याय आणि अत्याचार त्वरित थांबवण्यात यावेत अशा प्रमुख पाच मागण्या मांडण्यात येणार आहेत हा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधी कृती समिती, उमरगा तालुकाचे पदाधिकारी आणि स्थानिक नेते मा.आ. ज्ञानराज चौगुले, आ. प्रविण स्वामी, हरिश डावरे, कैलास शिंदे, एस.के. चेले, विजय वाघमारे, दिलीप भालेराव, रामभाऊ गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.






