Best News Portal Development Company In India

विधवा, परित्यक्ता सौभाग्यवती, बुद्धिस्ट, मुस्लिम महिलांनी वटवृक्ष लावून केला वटसावित्री सण साजरा.

विधवा, परित्यक्ता सौभाग्यवती, बुद्धिस्ट, मुस्लिम महिलांनी वटवृक्ष लावून केला वटसावित्री सण साजरा.

हीच पत्नी पुन्हा पुन्हा मिळो म्हणून पुरुषानी केली निसर्ग देवतेला प्रार्थना
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
येथील समाज विकास संस्था, उमरगा शहरातील मित्रपरिवार, वृक्षप्रेमी,मॉर्निंग वॉक मधील सर्व सदस्य मित्रगण यांच्या सर्वांच्या सहभागातून उमरगा धाराशिव जिल्ह्यामध्ये वडाची रोपे लावून वटपौर्णिमा सण साजरा केला.जगात वेगळेपण सिद्ध करण्यासाठी महिला सरसावल्या आहेत. हा सण फक्त सौभाग्यवतीचा नाही तर तो दिन दलित, उपेक्षित, विधवा परित्याक्ता,मुस्लिम, बुद्धिस्ट, ख्रिश्चन या सर्व समाजातील महिलांचा सण आहे.कारण झाडे असतील तरी पृथ्वी सुंदर दिसणार आहे.अगर पृथ्वीवर एकही झाड नसेल तर ही पृथ्वी जळून खाक होईल. जीव एकही शिल्लक राहणार नाही.म्हणून झाड हे महत्त्वाच आहे.झाडाला जात नसते, धर्म नसतो, वंश नसते,झाड हे झाड असतं.ते आपल्यासाठी असतं
म्हणून समाज विकास संस्थेने वेगळा पायंडा जगाला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.विविध समाजातील महिलांनी एकत्र येऊन शिवपुरी रोडला वडांची झाडे लावून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. झाडाची पूजा केली. झाडाला पाणी घातलं आणि या जगातल्या सर्व मानव जातीला रोगापासून मुक्त जीवन जगन्यासाठी,आनंदात जीवन जगण्यासाठी निसर्गातल्या सर्व शक्तींना प्रार्थना केली. या कार्यक्रमाचे आयोजन समाज विकास संस्थाचे कार्यवाह भूमिपुत्र वाघ, अनाथाची,गरिबांची माय विद्याताई वाघ,यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील साहित्यिक वर्षा भगवान असोले, सुनंदा प्रल्हाद वांझाळ, रामभाऊ पतंगे, इंजिनीयर किसन बाबरे,बापू बिराजदार,माझी पीएसआय बळवंत जमादार साहेब,महानंदा जमादार,लता नागदे, सुलक्षणा जामगे, फॉरेस्ट विभागाच्या माजी विभाग प्रमुख प्रमिला सूर्यवंशी मॅडम, मंजू पतंगे, ज्योतीताई पतंगे, प्रियंका पंढरपुरे प्रतिक्षा पंढरपूरे आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्यकारी मंडळाच्या प्रमिला कुंभार,ललिता नागदे, शुलबा जाधव, पल्लवी जाधव, सलोचना जामगे, अश्विनी पाटील, यांनी कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं.
या जगावेगळ्या महोत्सवाला उमरगा तालुक्यातील विविध गावातून शिवपुरी,ब्रह्मपुरी, विष्णुपुरी, जिजाऊ चौक, परिसरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष महिला सहभागी झाले होते..

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india