बसव प्रतिष्ठाच्या वतीने जिल्हा परिषद स्पेशल शाळेत १३३ विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप.
उमरगा/लोहारा /प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
बसव प्रतिष्ठाण अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने दि. २९ वार सोमवार रोजी महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव २०२६ औचित्य साधुन मुरूम भीम नगर येथील जिल्हा परिषद स्पेशल शाळेतील १ ते ७विच्या १३३ विद्यार्थ्यांना शाळे साठी लागणाऱ्या स्कूल बॅग, वॉटर बॉटल सहित सर्व शालेय साहित्याचे समाजसेवक डॉ.रामलिंग पुराणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे ४ आणि ७ वी स्पर्धा परीक्षा साठी लागणारे पुस्तक, डिक्सनरी सेट ही शाळेसाठी देण्यात आले. याप्रसंगी विजयकुमार देशमाने, विलास कंटेकुरे,बसव प्रतिष्ठाण अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे आदींची प्रमुख उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आला. अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पासून वंचित असतात आणि त्यामुळे ते शिक्षणापासून दूर जायला लागतात अशा विद्यार्थ्यांना पाठबळ मिळावे या उद्धात हेतूने बसव प्रतिष्ठाण च्या माध्यमातून सातत्याने शालेय उपयोगी कार्यक्रम राबविले जातात आणि त्याचाच एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याचे मत अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे यांनी मांडले. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार लिमये,आनंद कांबळे, मुख्यध्यापिका तुपेरे मॅडम,रुपचंद ख्याडे सर , शिवाजी गायकवाड सर , थिटे सर आदिंची उपस्थिती होती.






