* *किरण काशीनाथराव व्हंताळकर (गटकांबळे) याना वनस्पतीशास्त्र विषयात पीएच.डी प्रदान**
______________________
नळदुर्ग (एस.के.गायकवाड): येथील किरण काशीनाथराव व्हंताळकर (गटकांबळे) याना वनस्पतीशास्त्र विषयात नुकतीच पीएच.डी. प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ उद्धव भाले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानी पीएच डी चे संशोधन पूर्ण केले आहे. किरण व्हताळकर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे *”अरबसकुलार मायकोरायझल फनजाय आसोसीयटेड वूथ सोयीबीन ( ग्लायसीन मॅक्स) कल्टीव्हरस”* या विषयावर आपला संशोधन प्रबंध सादर केला होता.त्याने केलेले हे संशोधन सोयाबीन पीक उत्पादन वाढीसाठी व शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. धाराशीव जिल्ह्यातील सोयाबीन च्या विविध आठ वाणावर मायक्रोरायझल फनजायचे अस्तित्व कशाप्रकारचे आहे यावर संशोधन करून त्यापैकी सोयाबीनचे केडीएस-७२६ ( फुले संगम)* हे वाण उत्पादनवाढीसाठी अंत्यत चांगल्याप्रकारे आहे हे त्यानी या संशोधनाद्वारे सिद्ध केले आहे. त्यामुळे धाराशीव जिल्ह्याच्या मातीत या वरील वाणाची पेरणी करणे फायद्याचे ठरणार आहे.मॉयकोरायझल फनजाय ही एक वनस्पतीच्या मुळावर वाढणारी उपयुक्त बुरशी आहे. सद्या सर्वत्र आधूनिक तंत्राज्ञानानुसार शेतकरी प्रामुख्याने ह्या जैविकबु्शीजन्यचा खत म्हणून वापर करीत आहेत. शिवाय वनस्पतीवर पडणाऱ्या रोगांचे निर्मूलन सुद्धा ही बुरशी करते. त्याच्या या यशाबद्दल बालाघाट संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव चव्हाण,सचिव उल्हास बोरगावकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलुरे संचालक बाबुराव चव्हाण,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड, उपप्राचार्य डॉ अशोक कदम कार्यालयीन अधिक्षक धनंजय पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.






