Best News Portal Development Company In India

बसव प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा, जि.प.कन्या शाळेत १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

बसव प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. झाकीर हुसेन उर्दू शाळा, जि.प.कन्या शाळेत १२५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप!

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
दि.०१, येथील बसव प्रतिष्ठान अखिल भारतीय सामाजिक संघटनेच्या वतीने दि. ०१ वार बुधवार रोजी डॉ. झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक शाळेतील ई. १ ते ४ थीच्या सर्व ४५ विद्यार्थी व माध्यमिकच्या २० विद्यार्थ्यांना १० डझन वह्या,जि. प. कन्या प्राथमिक शाळेतील ई. १लि ते ४थीच्या सर्व ६० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य अध्यक्ष डॉ. रामलिंग पुराणे, आनंदनगर उपसरपंच तबरेज मासुलदार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी माध्यमिक मुख्याध्यापिका श्रीमती खतीब के. एम., प्राथमिक मुख्याध्यापिका श्रीमती कुरेशी जे. एन., कन्या प्राथमिक शाळा मुख्याध्यापक राठोड एस. एस.,विजयकुमार कोळी, शिक्षक वर्ग शहाजहान पटेल,रिजवान बागवान, जुबेर अत्तार, इम्तियाज जमादार,कानकुर्ती एन. पी , बुशरा सय्यद, बांगी मो. हनिफ , कर्मचारी जोहरबाशा शेख, विजय कांबळे, महेबूब जमादार, राहील सय्यद आदी उपस्थित होते. बसव प्रतिष्ठान च्या वतीने महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव निमित्त राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कार सोहळाचे आयोजन केले जाते, सण २०२५ पासुन पुरस्कार सोहळा व्यतिरिक्त शालेय साहित्य वाटपाचे उपक्रम राबविण्यात येत असून सण २०२६ मध्ये मुरूम शहरातील ५ शाळा व नाईकगर येथील १ शाळा असे एकूण ७ शाळेतील ५२९ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले असल्याचे अध्यक्ष डॉ. पुराणे यांनी सांगितले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india