Best News Portal Development Company In India

जनतेची सेवा करत करत नळदुर्ग नगर परिषदेचा विरुद्ध पक्ष गटनेता म्हणून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे : मारुती खारवे!

जनतेची सेवा करत करत नळदुर्ग नगर परिषदेचा विरुद्ध पक्ष गटनेता म्हणून त्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे : मारुती खारवे
——————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड ):
जनतेनी माझ्यावर विश्वास टाकून मला नगरसेवक म्हणून निवडून दिले त्या सर्वसामान्य जनतेची सेवा करत करत पक्षप्रमुखांनी माझ्यावर नळदुर्ग नगर परिषदेच्या विरोधी पक्ष गटनेता पदाची जबाबदारी ज्या विश्वासाने दिली त्या विश्वासाला पात्र राहून नळदुर्ग शहराच्या विकासात्मक कामात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करून मी माझ्या गटनेतेपदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे असे प्रतिपादन नळदुर्ग नगर परिषदेचे विरोधी पक्ष गटनेते तथा डाॅ.आंबेडकर इंग्लिश मीडियम स्कूल नळदुर्ग चे संस्थापक मारुती खारवे यांनी नळदुर्ग ता. तुळजापूर येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
. येथील हॉटेल ताज मध्ये नगरसेवक तथा गटनेते मारुती खारवे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या व मित्र परिवारांच्या वतीने अभिष्टचिंतनाच्या ।कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन रिपाइं (आठवले) चे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले. प्रारंभी बाबासाहेब बनसोडे यांच्या प्रस्ताविका नंतर मारुती खारवे यांचा उपस्थित सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने शाल,फेटा, पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन पेढा भरवून यथोचित सत्कार करून वाढदिवसाचा केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.
.यावेळी या.प्रसंगी रिपाइं(आठवले) चे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, रिपाइं (आठवले ) नळदुर्ग सर्कल प्रमुख राजेंद्र शिंदे,विद्युत महावितरण कंपनीचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते बालाजी वाघमारे आदींची ही शुभेच्छा पर भाषणे झाली.
यावेळी रिपाइं (आठवले) अल्पसंख्यांक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशीदभाई कुरेशी,बौद्धाचार्य तथा संपादक दादासाहेब बनसोडे,जेष्ठ कार्यकर्ते संजय रणे बाळू रणे, कुदरत शेख, सत्यवान कांबळे विजय साखरे किशोर धुमाळ, शिवाजी वाघमारे,संतोष साखरे बाबू कुंभार,राजू साखरे, दिलीप बनसोडे, शहबाज कुरेशी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india