Best News Portal Development Company In India

जळकोट येथे गणेश सोनटक्के यांनी स्वखर्चातून उभारले प्रवाशी बस थांबा निवारा !

जळकोट येथे गणेश सोनटक्के यांनी स्वखर्चातून उभारले प्रवाशी बस थांबा निवारा .
– – – – – – – – – – – – – – – – – –
जळकोट (अरुण लोखंडे ) जन सेवा हीच ईश्वर सेवा आणि आपण समाजाचं काही तरी देण
आहे ही उदात्त भावना डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटक्के यांनी स्वखर्चातून केली बस थांब्याची उभारणी .
याबाबत प्राप्त माहिती अशी की जळकोट हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले असून गावाला मोठी बाजार पेठ आहे गावामध्ये शाळा महाविदयालय असून दररोज हजारो नागरीकांची कामा निमीत्त ये जा असते शालेय मुले मुली याची पण दररोज येणे जाणे असते पण मात्र रोडवर बसची वाट पाहात थांबले असता त्याना कसल्याही प्रकारचा आडोसा आसरा नव्हता उन्हाळा पावसाळा हिवाळा या तिन्ही क्रतू मध्ये प्रवाशासह विद्यार्थ्यांचे खूप हाल होत . बऱ्याच दिवासा पासून नागरीकांची मागणी होती की जळकोटला प्रवाशी निवारा बस थांबा व्हावा पण याचे काही कुणाला देणे घेणे नव्हते . पण समाजसेवेचे ज्यानी व्रत्त हाती घेतले आहे ते गणेशराव सोनटक्के आणि त्याचे पुत्र पंचाचात समीतीचे सदस्य तथा माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समीती तुळजापूर ॲड आशिष सोनटक्के यांनी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते म्हलार दादा पाटील याच्या वाढदिवसांचे अवचीत साधून जळकोट येथे स्वखर्चातून रोडच्या दोन्हीही बाजुला प्रवाशाना बसण्यासाठी प्रवाशी निवारा बस थांबा तयार केला . असुन त्याचे उदघाटन पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह देशमुख व अर्थ आणि बांधकाम सभापती सिध्देश्वर कोरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले .यावेळी पंचायत समीतीच्या उपसभापती सौ रोहीणी मिलगिरी गणेश सोनटक्के नळदुर्ग नगर परिषदेचे अध्यक्ष बसवराज धरणे प्रकाश चव्हाण अशोक पाटील भिवा इंगले विवेकानंद मिलिगरी यशवंत कदम विलास राठोड अमृता चव्हाण नागनाथ किलजे हणमंत अंगुले संजय अंगुले संजय माने सुनिल माने प्रताप बेडगे मंगेश सुरवसे झानेश्वर साखरे राम जाधव प्रविण जाधव बाळासाहेब पाटील काशिनाथ पटणे अशोक साखरे श्रीशैल्य साखरे नामदेव कागे गणेश भोगे विठल भोगे सुभाष जाधव अजिक्य माने दामू लोखंडे शेषेराव लोखंडे ईराणा स्वन्ने शकील मुलाणी नासीर इनामादार काशिम जामदार बबलू बेडगे डी डी कदम सर चंद्रकांत स्वामी सर शांताप्पा पिसे सह प्रवाशी ग्रामस्थ व गणेशदादा सोनटक्के मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते कार्यकमाचे प्रास्ताविक आशिष सोनटक्के यांनी केले तर आभार अरुण लोखंडे यानी मानले हा उपक्रम राबविल्या बदल अशिष सोनटक्के याचे सर्वत्र कौतुक होत असुन प्रवाशानी आभार व्यक्त केले आहे .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india