Best News Portal Development Company In India

उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलची बिस्मिल्ला मुल्ला शिष्यवृत्तीधारक!

*उमरगा जिल्हा परिषद हायस्कूलची बिस्मिल्ला मुल्ला शिष्यवृत्तीधारक….*

उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा येथील आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद हायस्कूल मधील पाचवीचे 14 पैकी 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र झाले होते त्यातील कु. बिस्मिल्ला मुल्ला ही विद्यार्थिनी 220 गुण घेऊन शिष्यवृत्ती धारक झाली आहे. शिष्यवृत्तीधारक झालेल्या बिस्मिल्ला मुलाचे केंद्रप्रमुख शिला मुदगडे मुख्याध्यापक पद्माकर मोरे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सत्कार करण्यात आला.

प्रशालेतून गेल्या चार वर्षांत प्रशालेचे 10 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले आहेत यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक प्रवीण शिंदे वर्षाराणी पाटील सोनाली मुसळे यांनी मार्गदर्शन केले.

यशस्वी विद्यार्थ्यांचे उमरगा लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी युवा नेते किरण गायकवाड आकांक्षा चौगुले शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, सुजाता मोरे ,अमर वरवटे, अशोक पतगे, शिक्षणतज्ञ सदानंद शिवदे पाटील, मुख्याध्यापक पद्माकर मोरे गटशिक्षणाधिकारी अमोल राजपूत केंद्रप्रमुख शिला मुदगडे यांनी अभिनंदन केले 2025 मध्ये झालेल्या दहावी परीक्षेचा निकाल विकसित भारत बिल्डथाॕन 2025 मधील वैष्णवी केदारे चे जिल्ह्यातून प्रथम आलेले यश आणि त्यानंतर पाचवी स्कॉलरशिप मध्ये मिळाल्याने यशाने जिल्हा परिषद हायस्कूल उमरगा शाळेने सर्व क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केलेली आहे असे मत मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी मांडले.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india