Best News Portal Development Company In India

जवाहर गल्लीतील आरक्षित जागेसाठी तुळजापूर नगर परिषदेसमोरचे लाक्षणिक उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित!

जवाहर गल्लीतील आरक्षित जागेसाठी तुळजापूर नगर परिषदेसमोरचे लाक्षणिक उपोषण लेखी आश्वासनानंतर स्थगित!
तुळजापूर प्रतिनिधी:- तुळजापूर नगर परिषद हद्दीतील सिटी सर्व्हे क्र. ९७२ मधील एकूण २३६४.२० चौ.मी. पैकी ७३१ चौ.मी. आरक्षित जागेबाबत जवाहर गल्लीतील नागरिकांच्या वतीने आज तुळजापूर नगर परिषदेसमोर लोकशाही मार्गाने लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते. सदर जागा सार्वजनिक हितासाठी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी तुळजापूर नगर परिषदचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे यांनी लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले की, सदर जागेसंदर्भातील तक्रारी प्राप्त झालेल्या असून त्याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. तसेच हा विषय येणाऱ्या नगर परिषद सर्वसाधारण सभेमध्ये ठेवण्यात आलेला असून सभेच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. तसेच दि. ०६/०७/२०२६ रोजीचे लोकशाही मार्गाने सुरू असलेले लाक्षणिक उपोषण मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली.
या लेखी आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र भविष्यात या विषयावर ठोस कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्या वेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी महिला नगरसेविका, महिला कार्यकर्त्या, ज्येष्ठ नागरिक व परिसरातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला.
तसेच उपोषण स्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहून पाठिंबा देणारे तसेच काही कारणास्तव उपस्थित राहू न शकले तरी दूरध्वनीद्वारे पाठिंबा देणारे सर्व मान्यवर, नागरिक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी उपस्थित महिला नगरसेविका प्रियंका ताई गंगणे अमृता खपले वैशाली जाधव राजश्री कदम कमल पांढरे छबु काकू औटी सपना पांढरे आरती पांढरे व इतर महिला व ज्येष्ठ राजाभाऊ कदम सतीश भांजी नारायण शिंदे नागनाथ भाऊ भांजी बाबासाहेब पांढरे उत्तम नाना अमृतराव सुनील काका औटी व अमरीश भैय्या जाधव शहाजी काका भांजी विकास शिंदे सौरभ कदम नानासाहेब डोंगरे दादासाहेब खपले राहुल बंटी शिंदे नन्नू खंकाळ किरण हत्तीकर हंगरगेकर रणजीत पाटील प्रमोद भोरे विकी भांजी रोहन पांढरे भैय्या मगर आदी उपस्थित होते.
निर्णय न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या इशारा देण्यात येत आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india