अपमान आणि मारहाणीला कंटाळून तरुणाची आत्महत्या; गुलबर्ग्यातील ६ महिलांवर गुन्हा दाखल!
तुळजापूर प्रतिनिधी :- आत्महत्या च्या घटनेने तो गाव मध्ये खळबळ उडाली आहे. सततचा शारीरिक आणि मानसिक त्रास, जाहीर अपमान आणि मारहाणीला कंटाळून तुगाव (ता. उमरगा) येथील एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकुश देविदास इगवे असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात कर्नाटक मधील गुलबर्गा येथील ६ महिलांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत अंकुश देविदास इगवे (रा. तुगाव, ता. उमरगा, जि. धाराशिव) याने दिनांक ४ जुलै २०२६ रोजी रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
या आत्महत्येमागे आरोपींचा सततचा छळ कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. आरोपींनी बेकायदेशीर टोळी (गैरकायद्याची मंडळी) जमवून अंकुश याला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली. तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण करून अपमानजनक भाषा वापरली. आरोपींकडून सतत होणाऱ्या या तीव्र शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळूनच अंकुशने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी तक्रार मृताचे वडील देविदास नामदेव ईगवे (वय ६२ वर्षे) यांनी पोलिसांत दिली आहे.
मृताच्या वडिलांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून (FIR) उमरगा पोलिसांनी गुलबर्गा (कर्नाटक) येथील खालील संशयितांवर गुन्हे नोंदवले आहेत.
गुंडबाई पांडुरंग तोरखडे
सुधा नागेश माने
शांता आंबाजी गोत्राळ
महादेवी सचिन गरडकर
सुनिता गरडकर
प्रिया आंबाजी शिंदे
या प्रकरणी उमरगा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या खालील कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० (बेकायदेशीर जमाव व दंगल घडवणे), ३५२, ३५१(२) (अटकव किंवा अपमान करणे) आणि ११५(२) (मारहाण करणे).
दिनांक ५ जुलै २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सदर घटनेचा योग्य तपास करून आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरत आहे . उमरगा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





