Best News Portal Development Company In India

कांता चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

कांता चारिटेबल ट्रस्टच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप!

उमरगा /लोहारा आदिनाथ भालेराव.
कांता चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे जि प शाळा मुरळी, जि प शाळा कदेर व लोकमान्य टिळक शाळा कदेर येथे शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप दि . ३ रोजी करण्यात आले . यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष धनराज जाधव ,सचिव नुपूर जाधव ,मुरळीचे सरपंच नयनाबाई कांबळे ,उपसरपंच शमशोदिन जमादार आदींची प्रमुख उपस्थिती होती .
कांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम दरवर्षी घेण्यात येतात त्याचाच एक भाग म्हणून उमरगा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा मुरळी ,जिल्हा परिषद शाळा कदेर,लोकमान्य टिळक शाळा कदेर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले .यावेळी माजी सरपंच अनंत पाटील इमरान पटेल दिपक बिराजदार फुरकान पटेल विशंभर सुरवसे विनोद बिराजदार लोकमान्य टिळक संस्थचे अध्यक्ष मुरली जाधव , सचिव धनराज जाधव ,मुख्याध्यापक चौधरी सर ,बाळासाहेब गायकवाड , इस्माईल पटेल , शेषराव गायकवाड , अश्विनी वाघमारे ,आशा सूर्यवंशी , आयुब पठाण ,मुस्ताक जमादार , शफिक तांबोळी ,यासिन मोजणीदार ,हसन मोजणीदार , संभाजी कलबुरगे , शरद माने ,सचिन चौधरी ,मुबारक मोजणीदार ,आजीज इनामदार , दिगंबर कांबळे , मुरळी कदेर येथील नागरिक व कांता चॅरिटेबल ट्रस्ट चे सदस्य उपस्थित होते .

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india