Best News Portal Development Company In India

एकुरगा येथे रोटरी क्लब उमरगातर्फे मोफत आरोग्य व मोतीबिंदू तपासणी शिबिर!

एकुरगा येथे रोटरी क्लब उमरगातर्फे मोफत आरोग्य व मोतीबिंदू तपासणी शिबिर
—————
४६ रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवड
————–
उमरगा,/लोहारा आदिनाथ भालेराव.
दि. ६ :
रोटरी क्लब उमरगा, द पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन, शंकरशेठ साबळे आय हॉस्पिटल आणि एच. व्ही. देसाई आय इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने एकुरगा येथे सोमवारी मोफत मोतीबिंदू व नेत्र आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात पार पडले. शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
शिबिरामध्ये एकूण ११५ नागरिकांची मोतीबिंदू व नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६१ रुग्णांना मोफत चष्म्यांचे वितरण करण्यात आले, तर ४६ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या सर्व रुग्णांवर दि. ८ रोजी सोलापूर येथे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तसेच ३० नागरिकांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना पुढील उपचारांसाठी उमरगा येथे संदर्भित करण्यात आले आणि आवश्यकतेनुसार औषधोपचारही देण्यात आले.
सोलापूर येथील डॉ. महेश पवार, सौ. सूर्यवंशी आणि सौ. सिंधू यांनी तपासणीचे काम केले. यावेळी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ. राजकुमार कानडे यांनी रोटरीच्या विविध सेवा प्रकल्पांची माहिती देत समाजोपयोगी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. रोहित फडताळे यांनी रोटरी क्लबतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहितकारी उपक्रमांची माहिती दिली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सरपंच मधुकर कुनाळे, पोलीस पाटील महेशशंकर पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दत्तात्रय कुनाळे, ग्रामपंचायत सदस्य पंचपाम बोडगे, तलाठी श्री. गिरी, ग्रामसेवक नूर शहा, बलभीम जवळगे तसेच ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमास रोटरीचे माजी अध्यक्ष धनंजय मेनकुदळे, माजी सचिव प्रा. युसुफ मुल्ला, शिवकुमार दळवी, शमीम पठाण यांची उपस्थिती होती.
शिबिराचे आयोजन रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल मदनसुरे व सचिव शिवशंकर व्हडरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक करत अशा आरोग्य शिबिरांचे नियमित आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india