Best News Portal Development Company In India

औसा तालुक्यातील अलमला येथे विद्यार्थ्यांना चालना व उमेद प्राप्त होण्यासाठी यथोचित सत्कार सन्मान शुभेच्छा कार्यक्रम शरण पाटिल यांच्या हस्ते संपन्न !

औसा तालुक्यातील अलमला येथे विद्यार्थ्यांना चालना व उमेद प्राप्त होण्यासाठी यथोचित सत्कार सन्मान शुभेच्छा कार्यक्रम शरण पाटिल यांच्या हस्ते संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
औसा तालुक्यातील अलमला येथील श्री विश्वेश्वरय्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील उन्हाळी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रेरणादायी कार्यक्रमास उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

श्री विश्वेश्वरय्या शिक्षण संस्थेने दर्जेदार शिक्षण, उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून संपूर्ण मराठवाड्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. येथील विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान हा इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, अशा उपक्रमांमधून शिक्षणाची गुणवत्ता आणि स्पर्धात्मकतेला अधिक चालना मिळते असे मत उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, संस्थेचे सहसचिव महादेव खिचडे, संचालक जयशंकर हुरदळे, प्राचार्य प्रशांत धाराशिवे, शिरीषप्पा उटगे, बसवराज धाराशिवे, संतोष (मामा) पाटील, श्री. कैलास निलंगेकर, अमर भोसगे, सुजित शेळके तसेच संस्थेचे संचालक मंडळ, शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india