विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांचा विजापूर/कर्णाटक येथे व्याही विजयकुमार गौडा पाटिल यांच्या वतिने सत्कार करण्यात आला.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
कर्नाटक भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा व्याही श्री. विजयकुमार गौडा पाटील यांनी विजापूर येथे विधान परिषद निवडणुकीतील विजयाबद्दल विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.
यावेळी आमदार बसवराज पाटिल तसेच त्यांचे बंधू, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन व मुरूम शहराचे नगराध्यक्ष बापूराव पाटील यांनी हा सन्मान कृतज्ञतापूर्वक स्वीकारण्यात आला.
या प्रेम, आपुलकी आणि सन्मानाबद्दल विजयकुमार गौडा पाटील यांचे मनःपूर्वक आभार आ.पाटिल यांच्या वतिने व्यक्त करण्यात आले व हा स्नेह, विश्वास आणि शुभेच्छा यामुळे जनसेवेची प्रेरणा अधिक दृढ होत राहील आसा विश्वास व्यक्त करण्यात आला.
याप्रसंगी कोल्हापूर येथील कणेरी मठाचे पूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी, मनगोळी येथील पूज्य अभिनव संगन बसवा शिवाचार्य स्वामीजी, विजयापूरचे खासदार रमेश जिगजिनगी, सौ. प्रिती विजयगौडा पाटील, विजापूर भाजप जिल्हाध्यक्ष जी. डी. अंगडी, एम. आर. पाटील, शाश्वतगौडा पाटील, समर्थ गौडा पाटील, नितीन अग्रवाल, हर्ष गौडा पाटील, जत पंचायत समितीचे सभापती तमण्णागौडा पाटील, रवी पाटील, मदन पाटील, शरणप्पा स्वामी, सिद्धय्या स्वामी, गोविंद पाटील, उमेश कारजोळ, महालिंग बाबशेट्टी यांच्यासह विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.








