दाळींब जिल्हा परिषद शाळेत मिस्टानाचे वाटप व वृक्षारोपण कार्यकम संपन्न…..
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
शुक्रवार दि. १० जून रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दाळींब येथे दररोज विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले जाते त्यानुसार मुख्याध्यापक कोकळगावे ए. एन. यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून इयत्ता सहावी तील विद्यार्थिनी प्रगती सुधीर इगवे हिच्या आकराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुधीर इगवे व रुक्मिण इगवे या दांपत्याकडून शाळेत सर्व विद्यार्थ्यांना मिष्ठांना चे वाटप व १२१ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच इगवे परिवाराच्या वतीने पुजेची चांदीचा ताट, तांब्या भेट यावेळी देण्यात आली.
या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना वरण-भात मिठाई जिलेबी, चॉकलेट असा खाऊ मिष्टान्न म्हणून वाटप करण्यात आला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अमर वाले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष परमेश्वर देवकते, अखलाक भदभदे, संतोष माने, दिगंबर जाधव, मुन्ना पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका चव्हाण, कचले, सातपुते, जाधव, पवार, कांबळे, पांचाळ, जगताप आदी शिक्षक शिक्षिका, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, सह विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद जाधव यांनी केले. शेवटी मुख्याध्यापकांनी गावातील उपस्थितांना पालकांना असे उपक्रम प्रसंगानुसार शाळेत घ्यावेत शाळेला विविध रूपाने मदत करावी अशी आव्हान करून आभार व्यक्त केले.
यावेळी या दांपत्याकडून “एक पेड मां के नाम” अंतर्गत शाळेत मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२१ झाडे लावून वृक्षारोपण करण्यात आले. शाळेत केलेल्या उपक्रमाचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.








