मुरूम येथे धाराशिव/लातुर/बीड विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा विविध क्षेत्रातील मान्वरांकडुन सत्कार.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल आज मुरूम येथील आमदार बसवराज पाटील यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बाजार समितीचे संचालक सुरेश मंगरुळे, माजी संचालक आयुब मासुलदार, आडत असोसिएशनचे अध्यक्ष बालाप्रसाद काबरा, सचिव राजेंद्र पाटील, उपाध्यक्ष शरणाप्पा पाताळे, विष्णुदास मुंदडा, ज्ञानेश्वर चौधरी, प्रवीण सोलापूर, शरणाप्पा चिलोबा, पाशा अत्तार, अमृत वरनाळे, सुधीर टिकांबरे, सिद्रामप्पा बाबशेट्टी, बाळू चव्हाण, किशोर चव्हाण, किरण बरबडे, वैजिनाथ लादे, नागनाथ नरुणे, शरण कोरे, राजेंद्र स्वामी, केदार चारे, मल्लिनाथ घाळे तसेच मासूर्डी (ता. औसा) येथील माजी चेअरमन शंकरराव गरड, लातूर जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुग्रीव लोंढे, हनुमंतराव पाटील एकंबीकर यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.
तसेच मुरूम भीमनगर येथील बापूराव पाटील मित्र मंडळाच्या वतीने ही विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा जनता बँकेचे संचालक प्रा. अण्णाराव कांबळे, नगरसेवक रूपचंद गायकवाड, माजी नगरसेवक सी. एल. गोडबोले, उपमुख्याध्यापक संतोष कांबळे, प्रा. महेश कांबळे, प्रा. नागनाथ बनसोडे, राहुल गायकवाड, महेंद्र गायकवाड, प्रशांत गायकवाड, प्रशांत मुरूमकर, आशिष नाईकवाडे, विशाल कांबळे, महेंद्र कांबळे, माजी क्रीडा अधिकारी मदनलाल गायकवाड, प्रशांत सुरवसे आदींची उपस्थिती होती.
याशिवाय कोकळगाव (ता. निलंगा) येथील किरण उजने, अनिल कामले, मनोज लामतुरे, दत्ता मेहकरे, लाला शेख, संजय बिराजदार, संजय उजने, वसंत बिराजदार, द्रोणाचार्य कोळी, मनोहर वाघाण्णा, चंदनसिंग गहेरवार, दत्ता बनसोडे यांनीही भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि आशीर्वादामुळे जनसेवेची जबाबदारी अधिक जोमाने पार पाडण्याची प्रेरणा मिळत आहे. सर्वांचे आमदार बसवराज पाटिल यांच्या वतिने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.








