युवकांनी रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प करावा – रोहीत सुरवसे.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त मायक्रोकॉम कंम्प्युटर एज्युकेशनमध्ये प्रमाणपत्र वितरण.
उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
“आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पदवी पुरेशी नसून कौशल्य हीच खरी ताकद आहे. शासनाच्या विविध कौशल्य विकास योजनांचा लाभ घेऊन युवकांनी रोजगारक्षम बनावे तसेच नोकरी शोधणारे नव्हे तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याचा संकल्प करावा असे मत जिल्हा कौशल्य विकास अधिकारी रोहित सुरवसे यांनी व्यक्त केले.
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विकास विभागाच्या वतीने शहरातील मायक्रोकॉम कम्प्युटर एज्युकेशन येथे बुधवारी (दि १५) विविध उपक्रमांचे आयोजन करून युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
कौशल्य समन्वयक विद्या नाडे, जिल्हा समन्वयक समित सुरवसे, बाबासाहेब शेटे व मायक्रोकॉम कम्प्युटर एज्युकेशनचे संचालक प्रा. युसुफ मुल्ला यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना कौशल्य विकास अधिकारी रोहित सुरवसे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाचा उद्देश प्रत्येक युवकाला आधुनिक कौशल्यांनी सक्षम करून आत्मनिर्भर भारताच्या उभारणीत त्यांचा सहभाग वाढविणे हा आहे.”
यावेळी कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुमय्या जमादार, मोनिका जाधव, रमेजा मोमीन, रेवती वाडीकर, दिव्या सुर्यवंशी, कल्पश्री सुर्यवंशी व इरफान मुल्ला आदींनी यासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमास संस्थेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






