पी.ए.सी.एल. (पल्स) गुंतवणूकदारांसाठी डोंबिवलीत सहाय्यता केंद्राची सुरुवात
डोंबिवली : जनलोक प्रतिष्ठान सामाजिक, मुंबई कृती समिती यांच्या पुढाकाराने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापारी विभाग) यांच्या डोंबिवली येथील कार्यालयात पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदार व एजंटांसाठी विशेष सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या केंद्रामार्फत गुंतवणूकदारांना Investor Information Form भरणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, तक्रारी नोंदविणे तसेच न्यायप्रक्रियेसंदर्भातील प्राथमिक मार्गदर्शन अशा विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या सुविधेमुळे अनेक गुंतवणूकदारांना मोठा आधार मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
सहाय्यता केंद्रासाठी श्री. सचिन कडलक (मो. 8291251306) यांची संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, गुंतवणूकदारांनी आवश्यक माहितीसाठी त्यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री. शाम नाना चौगले आणि मुंबई विभाग अध्यक्ष श्री. अश्विन हेमंतकुमार केळकर (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग) यांनी सांगितले की, पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या गुंतवणूकदारांना योग्य मार्गदर्शन व मदत मिळावी, या सामाजिक उद्देशाने हे सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा.
या उपक्रमाला श्रीकांत कदम (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष), श्री. अभिजीत आपटे (महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष), प्रा. दिपक जाधव (मुंबई विभाग सचिव), श्री. व्यंकटेश नायडू (कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष) तसेच श्री. उदयराज तळेकर (मुंबई विभाग उपाध्यक्ष), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – उद्योग व व्यापारी विभाग यांनी शुभेच्छा देत सक्रिय सहकार्य केले.
डोंबिवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (उद्योग व व्यापारी विभाग) कार्यालयात हे सहाय्यता केंद्र कार्यरत असून, पी.ए.सी.एल. (पल्स) कंपनीच्या सर्व गुंतवणूकदार व एजंटांनी आवश्यक कागदपत्रांसह भेट देऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनलोक प्रतिष्ठान सामाजिक, मुंबई कृती समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे.







