Best News Portal Development Company In India

तुळजापूर पंचायत समितीत थरार! गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पेट्रोल फेकले; दोघांवर गुन्हा दाखल!

तुळजापूर पंचायत समितीत थरार! गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात पेट्रोल फेकले; दोघांवर गुन्हा दाखल!
​तुळजापूर प्रतिनिधी :- तुळजापूर पंचायत समितीतील या घटनेमुळे अधिकाऱ्यांची धांदल उडाली. प्राप्त माहितीनुसार गावातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने काढले नाही या रागातून पंचायत समिती तुळजापूर येथे थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या (BDO) दालनात पेट्रोलची बाटली फेकून शासकीय कामात अडथळा आणल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, काटी (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील रहिवासी असलेले आरोपी श्रीकांत घाटे आणि सारिका चुंगे हे दि. १५ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास पंचायत समिती तुळजापूर येथे आले. त्यांच्या गावातील अतिक्रमण ग्रामपंचायतीने न काढल्याचा राग त्यांच्या मनात होता.
​हाच राग मनात धरून दोन्ही आरोपींनी थेट माननीय गटविकास अधिकारी यांच्या दालनात प्रवेश केला. त्यांनी सोबत आणलेली पेट्रोलची बाटली गटविकास अधिकाऱ्यांच्या टेबलवर फेकली. या प्रकारामुळे टेबलवरील महत्त्वाच्या फाईल्स आणि कॉम्प्युटरचे मोठे नुकसान झाले.
​कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
​यावेळी दालनात उपस्थित असलेले फिर्यादी माणिक अंबऋषी नाईकवाडी (कनिष्ठ सहाय्यक, पंचायत समिती तुळजापूर) आणि आर. व्ही. पिंपळे (सहाय्यक प्रशासन अधिकारी) यांनी आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी या दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलून धक्काबुक्की केली व शासकीय कामात गंभीर अडथळा निर्माण केला.
​या धक्कादायक प्रकारानंतर फिर्यादी माणिक नाईकवाडी (रा. सहयोग नगर, नळदुर्ग रोड, तुळजापूर) यांनी तुळजापूर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या प्रथम खबरेवरून (FIR) आरोपी श्रीकांत घाटे आणि सारिका चुंगे यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १३२, २२१, ३२४(४) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​या घटनेमुळे पंचायत समिती परिसरात काही काळ भीतीचे व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
सतर्क घटना ने तुळजापूर पंचायत समितीत खळबळ उडाली आहे.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india