Best News Portal Development Company In India

आई तुळजाभवानी देवीच्या मंदीराच्या जागेचे भुमीपुजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते संपन्न…

आई तुळजाभवानी देवीच्या मंदीराच्या जागेचे भुमीपुजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते संपन्न….

उमरगा /लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.

उमरगा शहरातील कार्ले प्लॉट डिग्गी रोड परिसरातील आई तुळजाभवानी देवीच्या मंदीराच्या जागेचे भुमीपुजन नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते शुक्रवार दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.

आई तुळजाभवानी देवीच्या जागेसाठी कार्ले प्लॉट परिसरातील नागरिक जागा मिळावी म्हणून सर्वत्र पाहणी करीत होते. या चांगल्या कामासाठी नगराध्यक्ष किरण गायकवाड यांची मोलाची साथ मिळाली. नगराध्यक्ष किरण गायकवाड यांनी वैयक्तिक स्वरूपात मदत करीत जागा घेऊन दिली आहे. या ठिकाणी श्री तुळजाभवानी चॅरिटेबल ट्रस्ट या नावाने खरेदी करून जागेचे भुमीपुजन मोठ्या थाटामाटात नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नगर परिषदेचे गटनेते तथा नगरसेवक पंढरीनाथ कोणे, नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सचिन जाधव, नगरसेवक शफी चौधरी, नगरसेवक राहुल शिंदे, नगरसेवक शरद पवार, नगरसेवक सिध्दार्थ सोनकांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख योगेश तपसाळे, युवा नेते रोहित पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

या परिसरात राहणारे वाल्मिक बोयणे, वसंत वासुदेव, अहमद मुजावर, विलास दुधभाते, वलीसाहेब तांबोळी, कैलास स्वामी, प्रा. हुळमुजगे, अशोक खवडे, विश्वनाथ आलगुडे, शिवाजी माने, गोविंद सुर्यवंशी, लक्ष्मण पवार, गौरीशंकर तेली, संदीप जगदाळे, देवीची पुजारी सौ. सरस्वती पांचाळ या सह ओंकार साखरे, दत्ता जाधव, विनोद सगर, संदीप जाधव, ज्ञानेश्वर हिंडोळे, माजीद मुजावर, नितीन वासुदेव, अनिल पांचाळ, सिध्देश्वर हिंडोळे, हाणमंत पांचाळ, दिनेश बिराजदार, पंडित पांचाळ, सुरज मोरे, शैलेश जगताप, नागेश हिंडोळे यासह महिला भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljai Express
Author: Tuljai Express

2024 Reserved Tuljai Express | Designed by Best News Portal Development Company - Traffic Tail

best news portal development company in india