श्री तुळजाभवानी देवीच्या ‘सिंहासन पूजे’साठी उद्यापासून ऑनलाईन नोंदणी सुरू! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक-
तुळजापूर प्रतिनिधी:- महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या चरणी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘सिंहासन पूजा’ आता ऑगस्ट २०२६ महिन्यासाठी ऑनलाईन पद्धतीने बुक करता येणार आहे. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने ऑगस्ट महिन्यातील सिंहासन पूजा नोंदणीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, उद्या म्हणजेच १९ जुलै २०२६ पासून ऑनलाईन नोंदणीला सुरुवात होत आहे.
संस्थानने भाविकांच्या सोयीसाठी अधिकृत संकेतस्थळ उपलब्ध करून दिले असून, लॉटरी (ड्रॉ) पद्धतीने या पूजेचे वाटप केले जाणार आहे.
प्रमुख मुद्दे आणि वेळापत्रक:
भाविकांना मंदिर संस्थानच्या https://online.shrituljabhavani.org या अधिकृत लिंकवर जाऊन नोंदणी करावी लागेल. नोंदणीपासून ते अंतिम यादी प्रसिद्ध होईपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:
अ.क्र.तपशीलपासून (दिनांक व वेळ)पर्यंत (दिनांक व वेळ)
१)सिंहासन पूजा ऑनलाईन नोंदणी१९/०७/२०२६ (सकाळी १०:००)२४/०७/२०२६ (सकाळी १०:००)
२)ऑनलाईन ड्रॉ (प्रथम सोडत) आणि पेमेंटसाठी SMS पाठवणे२७/०७/२०२६ (सकाळी ११:००)–
३)प्रथम सोडतीमधील भाविकांसाठी ऑनलाईन पेमेंट करणे२७/०७/२०२६ (सकाळी ११:००)२८/०७/२०२६ (सकाळी १०:००)
४)द्वितीय सोडत (जागा शिल्लक राहिल्यास) व SMS पाठवणे२८/०७/२०२६ (सकाळी ११:००)–
५)द्वितीय सोडतीमधील भाविकांसाठी ऑनलाईन पेमेंट करणे२८/०७/२०२६ (सकाळी ११:००)२९/०७/२०२६ (सकाळी १०:००)
६)तृतीय सोडत (जागा शिल्लक राहिल्यास) व SMS पाठवणे२९/०७/२०२६ (सकाळी ११:००)–
७)तृतीय सोडतीमधील भाविकांसाठी ऑनलाईन पेमेंट करणे२९/०७/२०२६ (सकाळी ११:००)३०/०७/२०२६ (सकाळी १०:००)
८)ऑगस्ट २०२६ ची अंतिम बुकिंग यादी प्रसिद्ध करणे३०/०७/२०२६ (सायंकाळी १७:००)
भाविकांसाठी महत्त्वाची सूचना: > श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आणि कुलधर्म-कुलाचार करण्यासाठी महाराष्ट्र तसेच शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. सिंहासन पूजेचे बुकिंग केवळ वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटवरूनच होणार असल्याने, भाविकांनी वेळेत आपली नोंदणी पूर्ण करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.






