कन्हेरी चौक लातूर येथे धाराशिव, लातुर,बीड,विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यांचा सत्कार सोहळा संपन्न.
उमरगा/लोहारा प्रतिनिधी आदिनाथ भालेराव.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीतील ऐतिहासिक विजयाबद्दल लातूर महानगरपालिकेचे नगरसेवक श्री. गिरीष शेषराव पाटील व त्यांचे चिरंजीव श्री. अमृत (नाना) पाटील यांच्या वतीने माझा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. कन्हेरी चौक येथील रामकृष्ण मंगल कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यास विधानपरिषदेचे आमदार बसवराज पाटिल यानी उपस्थित राहून नम्रपणे सत्कार स्विकारण्यात आला.
हा सत्कार माझ्यावरील जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद यांचे प्रतीक असून, या सन्मानामुळे जनसेवेची जबाबदारी अधिक वाढल्याची भावना मनात दृढ झाली असल्याचे मत बसवराज पाटिल यांनी व्यक्त केले.
यावेळी सद्गुरू गहिनीनाथ महाराज औसेकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज, ह.भ.प.गोरखनाथ महाराज, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. उषाताई पाटील, अमृत (नाना) पाटील, देविदास काळे, दीपक मठपती, टाकळीकर, ॲड. श्री. परीक्षित पवार, सौ. रागिणीताई यादव, प्रेरणाताई होनराव, सौ. राजश्री बाहेती, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे,शिरीषप्पा उटगे, दिलीप भालेराव, प्रविण कस्तुरे, ॲड. प्रदीप मोरे, सौ. शिंदे ताई, गणेश गवारे, मधुसूदन पारीख, बसवराज वळसंगे, भीमाशंकर बेंबळे, सुनील मिटकरी, शेषराव पाटील, रवी महाराज, श्री. संभाजी पाटील, सुभाष मुक्ता, सौ. सीमाताई करपे, ॲड. सौ. शीतलताई पाटील, नगरसेवक अनंत गायकवाड, शेटे यांच्यासह अमृत पाटील मित्र परिवाराचे सर्व सहकारी, लातूर महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक-नगरसेविका तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.








