वागदरी येथे भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखेचे उद्घाटन : नूतन कार्यकारणी जाहीर!
—————————————————–
नळदुर्ग (एस. के. गायकवाड):
तुळजापूर तालुक्यातील मौजे वागदरी येथे वर्षावासाचा पूर्वसंध्येला दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा वागदरी चे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजश्रीताई कदम यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तुळजापूर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा ऑडिटर
प्रा.विवेकानंद वाहुळे हे होते व प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे धाराशिव जिल्हा सरचिटणीस विजयकुमार बनसोडे,जिल्हा संस्कार विभाग उपाध्यक्ष बाळासाहेब बागडे, जिल्हा संघटन सचिव बाजीराव साबळे,बौधाचार्य दादासाहेब बनसोडे आदी उपस्थित होते.
. प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. विवेकानंद वाहुळे सर म्हणाले की पुरोगामी महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला संत साहित्याच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायाच्या चळवळीचा वारसा लाभलेला असून संत साहित्य हे दया क्षमा शांती आणि समतेची शिकवण देते.तर अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी संपूर्ण जगाला समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्यायाची व मानवतेची शिकवण दिली. प्रज्ञा शील करूणेचा संदेश दिला.यावरून संत साहित्यावरही तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव असल्याचे दिसून येते.याची व्यापक चर्चा झाली पाहिजे. बौद्ध धर्म हा मानवी कल्याणाचा राजमार्ग असून आपण सर्वांनी बौद्ध धम्माचे आचरण करणे काळाची गरज आहे.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेच्या धाराशिव जिल्हा अध्यक्ष राजश्रीताई कदम यांच्या हस्ते वागदरी ग्राम शाखेचे उद्घाटन करून नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली ती पुढील प्रमाणे अध्यक्ष कविता गायकवाड, सरचिटणीस उज्वला वाघमारे, कोषाध्यक्ष कोमल झेंडारे, संस्कार उपाध्यक्ष गुरुनाथ वाघमारे,संस्कार सचिव शिवाजी वाघमारे, संरक्षण उपाध्यक्ष सूर्यकांत,वाघमारे संरक्षण सचिव दीपक वाघमारे,महिला उपाध्यक्ष श्रीदेवी वाघमारे, महिला सचिव गिताबाई झेंडारे,पर्यटन उपाध्यक्ष अनिल वाघमारे, पर्यटन सचिव बाबासाहेब वाघमारे,संघटक कमल धाडवे, ठकुबाई वाघमारे, सुगंधा वाघमारे,सुषमा वाघमारे,आदींची निवड जाहीर करण्यात आली.
या वेळी नागनाथ बनसोडे,चंद्रकांत वाघमारे,
एस.के.गायकवाड,दत्ता झेंडारे,कुंडलिक वाघमारे, पांडुरंग बनसोडे,मुकेश धाडवे,जिजाबाई वाघमारे,वंदना वाघमारे गेंदाबाई बनसोडे सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








